मुंबई

ग्रामीण भागातील रिसॉर्टला पसंती

CD

ग्रामीण भागातील रिसॉर्टला पसंती
पोयनाड, ता. ३० (बातमीदार) : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ग्रामीण भागातील रिसॉर्टला पर्यटकांची पसंती दिसून येत आहे. पोयनाड परिसरातील ग्रामीण भागात आणि खासकरून दुर्गम भागात डोंगराच्या पायथ्याशी आता छोटे मोठे रिसॉर्ट आणि होम-स्टे झाले आहेत. या होम-स्टेमध्ये शहरी भागातील पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत.
सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असल्याने पर्यटकांची पावले अलिबाग आणि मुरूडकडे वळत आहेत. मात्र पोयनाड परिसरातील निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या ग्रामीण भागातील रिसॉर्टलादेखील मुंबई, पुणे, नाशिक येथील पर्यटकांकडून खास पंसती देण्यात आली आहे. निसर्गरम्य वातावरण, हिरवीगार वनराई, राहण्याठी अत्याधुनिक खोल्या, स्विमिंग पूल, जेवणाची उत्तम सोय या सर्व सोयीमुळे पर्यटक ग्रामीण भागातील रिसॉर्ट आणि होम- स्टेला पसंती देताहेत. पोयनाड परिसरात वाघोडे, नागझरी, वडवली, ताडवागळे, कोळघर, तळाशेत, भायमळा, तीनवीरा, श्रीगाव, नवेनगर या भागातील हॉटेल आणि रिसॉर्ट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हाउसफुल्ल झाली आहेत. पोयनाड परिसरातील या रिसॉर्ट आणि हॉटेलच्या परिसरात मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांच्या गाड्या नववर्ष स्वागतासाठी मोठ्या संख्येने दाखल झाल्या आहेत.
...............
चौकट :
पोपटीच्या शेंगांची भुरळ
पोयनाड परिसरात रिसॉर्टमध्ये जेवणासोबतच वालाच्या शेंगांपासून तयार होणारी पोपटी पर्यटकांना आकर्षित करीत आहे. ग्रामीण भागात तयार होणाऱ्या वालाच्या आणि पावट्याच्या शेंगा त्यासोबत अंडी, चिकन, बटाटा हे पोपटीसोबत रात्रीच्या वेळी गरम गरम खाण्यासाठी उपलब्ध होत असल्याने मुंबई आणि पुण्यातून नववर्ष स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना याची भुरळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मॅच विनर खेळाडूची एन्ट्री; BCCI ने जाहीर केला बदल

Land Acquisition Payment To Farmers : नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार

Panchang 18 February 2026: आजच्या दिवशी श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शेगावचं गजानन महाराज मंदिर बंद राहणार? सोशल मिडियावरील 'त्या' मेसेजबाबत संस्थांकडून स्पष्टीकरण...

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या नजरा 'पीएम किसान' हप्त्याकडे; कधी जमा होणार 22 वा हप्ता? जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लाभार्थी

SCROLL FOR NEXT