मुंबई

बाजारात कांद्याचे दर स्थिर;

CD

बाजारात कांद्याचे भाव स्थिर
आवक वाढल्याने ग्राहकांना दिलासा
तुर्भे, ता. ३० (बातमीदार) : वाशी येथील घाऊक भाजीपाला बाजारात सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने भाव स्थिरावले आहेत. महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेशमधूनही कांद्याची आवक सुरू झाल्यामुळे बाजारातील मागणी सहजपणे पूर्ण होत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक असल्याने आगामी काही दिवस कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
वाशीतील घाऊक कांदा-बटाटा बाजारात दररोज सरासरी ८० हून अधिक वाहनांमधून कांद्याची आवक होत आहे. सध्या बाजारात कांदा २७ ट्रक व ५६ टेम्पोमधून येत असून, एकूण ८३ वाहनांद्वारे कांद्याचा पुरवठा होत आहे. तर बटाट्याची आवक २८ ट्रक व १६ टेम्पोमधून होत असून, एकूण ४४ वाहनांद्वारे बटाटे बाजारात दाखल होत आहेत. हिवाळ्याच्या हंगामात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात ओला कांदा बाजारात येतो. ओला कांदा साठवणुकीदरम्यान खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. त्‍यामुळे चांगल्या सुक्या कांद्याचे भाव वाढतात. यंदा परिस्थिती वेगळी असून, ओल्या कांद्याबरोबरच मध्य प्रदेशमधून दर्जेदार सुका कांदाही मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे एकूणच कांद्याची उपलब्धता वाढली असून, बाजारात तुटवड्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही. सध्या घाऊक बाजारात कांद्याचे भाव प्रतिकिलो १० ते २० रुपयांच्या दरम्यान असून बटाट्याचे भाव १० ते १५ रुपयांपर्यंत आहेत. आवक अशीच सुरू राहिल्यास हे भाव काही दिवस स्थिर राहतील, असा विश्वास घाऊक व्यापारी दिंगबर राऊत यांनी व्यक्त केला आहे. दर स्थिर राहिल्यामुळे किरकोळ बाजारातही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येण्याची अपेक्षा असून, गृहिणींसह हॉटेल व्यावसायिकांनाही दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs NAM सामन्यावर पावसाचे ढग; ऑस्ट्रेलियासारखीच पाकिस्तानची अवस्था होणार? नेमकं कसं आहे समीकरण

पैशांचा पाऊस! 8.5 कोटींच्या नोटांनी झाकला डान्स फ्लोअर; शाही लग्नाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल, एवढी मोठी कॅश पाहून वऱ्हाडी मंडळीही अवाक्

Latest Marathi News Live Update : पंढरपुरात टेम्पो दुचाकीमध्ये भीषण अपघात, तीन जण जखमी

VIDEO : रोडवरची पाणीपुरी पडेल महागात! पाण्यात आढळला चक्क जिवंत उंदीर; नेटकरी म्हणाले, ही तर नॉनव्हेज पाणीपुरी!

Pune News : मुळशीत रिंग रोडच्या कामावेळी डंपर घरावर उलटला, दोन महिलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT