तुर्भे, ता. ३० (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)मध्ये कोकणातील देवगड केसर आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. या हंगामामध्ये पारंपरिक हापूस (अल्फान्सो), मलावी हापूस, कर्नाटकी हापूसनंतर आता देवगड केसर आंब्यानेही बाजारात प्रवेश केला आहे. त्यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साह पसरला आहे.
फळांचा राजा असलेला हापूस आंबा बाजारातही राजा आहे. त्यामुळे या फळाचे स्वागतही राजासारखेच होत असते. हापूस आंब्याची हंगामातील पहिली पेटी बाजारात आली, की तिची विधिवत पूजा करून व्यापारी आंब्याच्या विक्री हंगामाला सुरुवात करतात. यावर्षी वर्ष संपण्याच्या एक दिवस आधीच देवगड तालुक्यातील वाघोटनमधून केसर आंब्याची पहिली पेटी वाशीच्या घाऊक फळबाजारात दाखल झाली. शेतकरी जावेद मुल्ला यांनी आपल्या शेतात केसर आंब्याची बाग फुलवली आहे. त्यांनी या बागेतून आंबा हंगामातील केशर आंब्याची पहिली चार डझनाची आंब्याची पेटी सोमवारी (ता. २९) रवाना केली आहे. मंगळवारी सकाळी ही पेटी बाजारात घाऊक व्यापारी संजय पानसरे यांच्याकडे दाखल झाली आहे. त्यानंतर या आंब्याच्या पेटीची विधिवत पूजा करण्यात आली.
कोकणामध्येही लागवड
चार डझन देवगड केसर आंब्याचा प्रति किलो हजार ते बाराशे रुपये दर आहे. केसर आंबा हा पारंपरिकपणे गुजरातमध्ये जास्त पिकतो; पण गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कोकणातही त्याची शेती वाढत आहे. याआधी केसर हापूस हा गुजरातमधूनच विक्रीसाठी येत होता. त्यामुळे केसर हापूस हा मेमध्ये एपीएमसी बाजारात दाखल होत असे; मात्र आता कोकण, विदर्भ व मराठवाडा याठिकाणीदेखील या आंब्याची शेती केली जाते. त्यामुळे आंबाप्रेमींना आता डिसेंबरअखेरच केसर हापूसची चव चाखता येऊ लागली आहे.
गेल्या काही वर्षांपासून देवगडमध्ये केसर आंब्याची लागवड केली जाते. त्यामुळे बाजारात हा आंबा जानेवारी, फेब्रुवारीमध्येच दाखल होतो. मराठवाडा, विदर्भ याठिकाणीदेखील या आंब्याची लागवड वाढत आहे.
- संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.