मुंबई

रामा ७६ ते घोणसई रस्त्याचे काम सुरू

CD

रामा ७६ ते घोणसई रस्त्याचे काम सुरू
‘सकाळ’च्या वृत्ताचा परिणाम; दोन वर्षांपासून रखडलेल्या कामाला मुहूर्त
वाडा, ता. ३० (बातमीदार) : तालुक्यातील रामा ७६ ते घोणसई या १.२५० किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रखडलेले काम ‘सकाळ’मधील वृत्ताची दखल घेत अखेर सोमवारपासून (ता. २९) पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मुदत संपूनही रस्ता अपूर्ण असल्याने नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि कंत्राटदाराला तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यासाठी एक कोटी ६५ लाख ६४ हजार ८२२ रुपयांचा निधी मंजूर आहे. मयूर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स या कंपनीला १८ महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचा कार्यारंभ आदेश नोव्हेंबर २०२३ मध्ये देण्यात आला होता; मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही ५०० मीटरचे काँक्रीटीकरण वगळता उर्वरित ७५० मीटरचे डांबरीकरण आणि साइडपट्टीचे काम रखडलेलेच होते. रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडल्याने शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. ‘सकाळ’ने या समस्येला वाचा फोडल्यानंतर यंत्रणा हलली आणि रखडलेल्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
दरम्‍यान, रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण न झाल्याने लोकांमध्ये संताप होता. ‘सकाळ’च्या बातमीमुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि अखेर कामाला गती मिळाली आहे. आता हे काम दर्जेदार आणि लवकरात लवकर पूर्ण व्हावे, हीच अपेक्षा आहे, अशा भावना येथील स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT