सोसायटी अध्यक्षपदी काशिनाथ भोईर
वाडा, ता. ३० (बातमीदार) : तालुक्यातील नावलौकिक मिळवलेल्या खरीवली सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी काशिनाथ भोईर यांची तर उपाध्यक्षपदी सुनंदा अधिकारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सदस्यपदी सचिन भोईर, अक्षय अधिकारी, समीर अधिकारी, मंगेश अधिकारी, यशवंत पाटील, शरद भोईर, गिरीश पाटील, आनंदी अधिकारी, संजय गायकवाड, बाळ माळी आदींची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा मनोदय नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.