मुंबई

शिक्षकांचे तंबाखू मुक्त शाळा विषयक प्रशिक्षण

CD

शिक्षकांचे तंबाखू मुक्त शाळा विषयक प्रशिक्षण
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संयुक्त उपक्रम
उरण, ता. ३० (वार्ताहर) : ग्रामीण भागात वाढत चाललेल्या तंबाखू व्यसनाला आळा घालण्यासाठी आणि शालेय स्तरावर प्रभावी जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने उरण तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे ‘तंबाखू मुक्त शाळा’ विषयक एकदिवसीय प्रशिक्षण नुकतेच पंचायत समिती उरण येथे पार पडले. हे प्रशिक्षण उरण ग्रामीण रुग्णालय, शिक्षण विभाग पंचायत समिती आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबासो काळेल, गटशिक्षणाधिकारी निर्मला घरत, सलाम मुंबई फाउंडेशनच्या प्रशिक्षक सारिका ब्राऊन, दंत शल्यचिकित्सक डॉ. संतोष झापकर तसेच जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे प्रतिनिधी सुशील साईकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना डॉ. बाबासो काळेल यांनी सांगितले की, तंबाखूच्या वाढत्या व्यसनामुळे अनेक गंभीर आजार उद्भवत असून उपचारासाठी रुग्णांना दूरवर जावे लागते. यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये आयुष्यभरासाठी सकारात्मक सवयी रुजविण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. संतोष झापकर यांनी तंबाखूचे दुष्परिणाम, तोंडाचा कर्करोग व इतर कर्करोग तसेच कोटपा कायदा २००३ याबाबत सविस्तर माहिती दिली. तर सलाम मुंबई फाउंडेशनच्या सारिका ब्राऊन यांनी तंबाखू मुक्त शाळा संकल्पना, तिचे महत्त्व आणि त्यासाठीचे ९ निकष याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शार्टसर्किटमुळे दुर्घटना

Dhangar Community: मेंढपाळ धनगरांसाठी अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाचे संकेत; कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक!

Hasan Mushrif Kolhapur Politics : जिल्हा बँक, गोकुळ, झेडपी, बाजार समिती आणि मंत्रीपद, मुश्रीफांचे ‘सब कुछ कागल’ मग जिल्ह्याला काय

Latest Marathi News Live Update : आज पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा

Beed Illegal Mining: अवैध खदानीत मृत्यू; पीक विमा उचलून प्रशासनास डल्ला?;ज्ञानेश्वर सावंतच्या खदानीत घोटाळा

SCROLL FOR NEXT