मुंबई

सेक्युलर काँग्रेसने हिंदू असल्याने मुलाला तिकीट नाकारल्याचे दुःख : माजी खासदार सुरेश टावरे

CD

सेक्युलर काँग्रेसने हिंदू असल्याने मुलाला तिकीट नाकारल्याचे दुःख
माजी खासदार सुरेश टावरे यांची खंत


भिवंडी, ता. ३० (वार्ताहर) : ज्या शहरात आम्ही हिंदू-मुस्लिम एकोप्यात एवढी वर्षे राजकारण करीत आलो, त्या शहरात महापालिका निवडणुकीत प्रभागात हिंदू मतदार कमी असल्याने माझ्या मुलाला उमेदवारी नाकारल्याने दुःख होत असल्याची खंत माजी खासदार सुरेश टावरे यांनी व्यक्त केली आहे. लवकरच आपल्या कार्यकर्त्यांसोबत बोलून योग्य तो राजकीय निर्णय घेणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरेश टावरे यांनी आपला मुलगा मृगस्य यासाठी प्रभाग क्रमांक ७ मधून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. त्याबाबत प्रदेश पदाधिकाऱ्यांनीसुद्धा आश्वासन दिले होते. पण ऐनवेळी काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर यांनी सुमारे २७ हजार मतदारसंख्या असलेल्या प्रभागात अवघे दोन हजार हिंदू मतदार असल्याने उमेदवारी देण्यास नकार दिला. या गोष्टीला प्रदेश पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवत माझ्या मुलाची उमेदवारी नाकारली हे पाहिल्यावर सेक्युलर असलेल्या काँग्रेसकडून आता कोणती अपेक्षा कराल, असा सवाल माजी खासदार सुरेश टावरे यांनी उपस्थित केला. मी स्वतः या विभागातून निवडून आलो होतो. आमचे एवढ्या वर्षांचे सलोख्याचे संबंध असताना आज धर्म अडवा कसा आला, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.
-----
चौकट
भिवंडीत समाजवादीचे आमदार रईस शेखसमोर काँग्रेस हतबल
भिवंडी काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण असताना सर्वच प्रभागांतून असंख्य इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण ऐनवेळी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यात वादंग झाल्याने आमदार रईस शेख यांनी काँग्रेस वरिष्ठांकडे मॅनेज करीत भिवंडी पूर्व विभागाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे पक्षाने पक्षाशी कोणताही संबंध नसलेल्या आ. रईस शेख यांच्याकडे परस्पर ४५ एबी फॉर्म दिले. यामुळे भिवंडी पूर्वमधील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम पक्षाने केले असून, पक्ष रईस शेख यांच्यासमोर हतबल झाला आहे, अशी टीका माजी खासदार सुरेश टावरे यांनी केली आहे. विशेष म्हणजे या भागातील अनेक प्रभागांत एबी फॉर्म असतानाही ते न भरता दुसऱ्या पक्षाचे एबी फॉर्म भरीत असल्याने उद्या समाजवादी व काँग्रेस या दोन्ही पक्षांवर रईस शेख यांनी ताबा मिळवला तर आश्चर्य वाटायला नको, अशी खंत सुरेश टावरे यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Vidhan Bhavan Bomb Threat: विधानभवनात बॉम्बची धमकी! ई-मेलनंतर मुंबईत खळबळ; पोलिस-बॉम्ब स्क्वॉडची धावपळ, मोठी शोधमोहीम सुरू

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवस उन्हाचा कडका, विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तापमान 40 पार जाण्याची शक्यता!

LPG Cylinder Price Hike : गॅस संकट गडद, जाणून घ्या तुमच्या शहरात आज किती आहे LPG सिलिंडरचा दर ?

शुभमंगल सावधान! इशा डेचं धुमधडाक्यात लग्न, सोशल मीडियावर फोटो VIRAL

LPG Gas Crisis: पंधरा दिवस युद्ध चालल्यास गॅस संकट गडद; इंधन दरवाढीसह आयातीवर परिणाम साठेबाजी रोखण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT