मुंबई

ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीला फटका

CD

ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीला फटका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : ईशान्य मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची ताकद होती. पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांनी पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता पक्षाला ईशान्य मुंबईत फटका बसणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आता भांडुप, गोवंडी, मुलुंड, कुर्ला या भागात आपली ताकद अजमावणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पश्चिम उपनगरात काही मुस्लिम भागात आपली ताकद वाढविण्यासाठी उमेदवार दिले आहेत.

राखी जाधव यांच्याआधी ईशान्य मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय पिसाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्षात) प्रवेश केला आहे. आता जाधव यांनी पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची ईशान्य मुंबईची ताकद कमी झाली आहे. पक्षाने माजी नगरसेवकांना तसेच प्रभागात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली नाही; याबद्दल नाराजी व्यक्त करीत जाधव यांनी पक्ष सोडला आहे. शिवसेनेसोबत युती करून पक्षाचे नुकसान झाले आहे, अशी भावना या नाराजींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे हक्काचे नगरसेवक निघून गेल्याने पक्षाचे नुकसान झाले आहे. घाटकोपर, भांडुप, कांजूर, मुलुंड येथील पक्षाचे पदाधिकारी नाराज असल्याचे समजते.

पश्चिम उपनगरावर भर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पश्चिम उपनगरावर लक्ष केंद्रित केले आहे. नवाब मलिक यांचा प्रभाव असलेला पूर्व उपनगरातील मुस्लिम पट्टा, दक्षिण मध्य मुंबईतील काही भागात उमेदवारी देऊन, तसेच पश्चिम उपनगरातील बहुतांश मतदारसंघात उमेदवार उभे करून ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहेत; मात्र त्यांचा शिवसेना-भाजप महायुतीला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT