पाच दिवसांत २६ हजार प्रवासी
नवी मुंबई विमानतळाहून प्रवास
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने यशस्वीपणे कामकाज सुरू केले आहे. पहिल्या पाच दिवसांत एकूण २६,०२१ प्रवाशांची नोंद झाली आहे. यामध्ये १२,४३१ आगमन आणि १३,५९० प्रस्थानांचा समावेश आहे.
विमानतळ सुरू झाल्यापासूनची जोरदार मागणी आणि सातत्यपूर्ण बुकिंग होत असल्याची नोंद झाली आहे. या आठवड्याच्या शेवटी प्रवाशांची संख्या शिगेला पोहोचली होती. शनिवारी ५,५४८ आणि रविवारी ५,६१४ प्रवाशांनी प्रवास केला. या कालावधीत एनएमआयने १६२ नियोजित विमान वाहतूक सेवा हाताळल्या, ज्यात ८१ आगमन आणि ८१ प्रस्थानांचा समावेश होता. सध्या एनएमआयए १३ प्रमुख देशांतर्गत शहरांशी जोडलेले आहे. अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, कोची, कोईम्बतूर, दिल्ली, गोवा (मोपा), हैदराबाद, जयपूर, लखनऊ, मंगळूर, नागपूर आणि वडोदरा यांचा समावेश आहे. विमानतळ पुढील महिन्यात अतिरिक्त शहरांना सेवा देण्यासाठी आपले नेटवर्क विस्तारण्याची अपेक्षा करीत आहे.
Date Arrival Passengers Departure Passengers Total Passengers
तारीख आलेले प्रवासी उड्डाण केलेले एकूण
२५ डिसें. २,२७८ २,६४४ ४,९२२
२६ डिसें. २,२४३ २,७८५ ५,०२८
२७ डिसें. २,६५९ २,८८९ ५,५४८
२८ डिसें. २,७४९ २,८६५ ५,६१४
२९ डिसें. २,५०२ २,४०७ ४,९०९
एकूण १२,४३१ १३,५९० २६,०२१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.