वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी
९४९ उमेदवारी अर्ज दाखल; अनेक ठिकाणी बंडखोरी
विरार, ता. ३० (बातमीदार) ः वसई विरार महापालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. आज संध्याकाळी उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आज अनेक पक्षांत बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वात जास्त फटका हा भाजपला बसल्याचे बोलले जात आहे. आज शेवटच्या दिवशी ९४९ इतक्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
वसई विरार महापालिकेची पाच वर्षांपासून रखडलेली निवडणूक अखेर १५ जानेवारीला होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज भरेपर्यंत महायुती अथवा आघाडीकडून बंडखोरीच्या भीतीने उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक प्रभागांत बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाली आहे. बंडखोरीचा सर्वात जास्त फटका हा भाजपला बसल्याचे बोलले जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शेखर धुरी, पालिकेतील भाजपचे एकमेव नगरसेवक किरण भोईर, संजय पांडे अशा लोकांनी बंडखोरी करून पक्षाला धक्का दिला आहे.
============================
पक्षातर्फे भरलेले अर्ज
१) बहुजन विकास आघाडी १००
(मनसे आणि स्वराज अभियानसह)
२) काँग्रेस १५
शिवसेना (उबाठा) ९५
५) एमआयएम ३
६) भाजप ८८
७) शिवसेना (एकनाथ शिंदे गट) २७
======================================
महापालिकेसाठीचे प्रभाग २९
४ चे २८ आणि एक प्रभाग ३ चा
एकूण नगरसेवकांची संख्या ११५
================================
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.