९० जागांसाठी १,०३३ उमेदवारांचे अर्ज
भिवंडीत शेवटच्या दिवशी अर्जांचा पाऊस
भिवंडी, ता. ३१ (वार्ताहर) : भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी एकच गर्दी पाहायला मिळाली. शेवटच्या दिवशी तब्बल ७६३ अर्ज दाखल झाले असून, ९० जागांसाठी आता एकूण १,०३३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सर्वच प्रभागांत चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
अर्जांची संख्या पाहता अनेक प्रभागांमध्ये दुरंगी आणि तिरंगी लढतीचे चित्र असण्याची शक्याता आहे. मात्र येत्या दोन दिवसांत पक्षांकडून नाराज उमेदवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जातील. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र आणि रिंगणात उरलेले अंतिम उमेदवार स्पष्ट होतील. सध्या तरी १,०३३ अर्जांमुळे प्रशासकीय यंत्रणेवरचा ताण वाढला असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
अर्जांची आकडेवारी
निवडणूक निर्णय अधिकारी शेवटच्या दिवशी आलेले अर्ज एकूण अर्ज
कार्यालय क्रमांक १ १०४ ११७
कार्यालय क्रमांक २ ९३ ११५
कार्यालय क्रमांक ३ १७८ २०३
कार्यालय क्रमांक ४ १३३ २२१
कार्यालय क्रमांक ५ ७४ १३२
कार्यालय क्रमांक ६ ७६ १२६
कार्यालय क्रमांक ७ १०५ ११९
एकूण ७६३ १,०३३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.