मुंबई

हिमोफिलिया ग्रस्तांना मदतीला धावली अमेरिका

CD

हिमोफिलियाग्रस्तांच्या मदतीला धावली अमेरिका
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी
ठाणे शहर, ता. ३१(बातमीदार) ः हिमोफिलिया आजाराने ग्रस्त असलेल्या २७ शालेय विद्यार्थ्यांना नऊ लाख १८ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या शरीरातील रक्त गोठाण्याची प्रक्रिया थांबल्यामुळे ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या उपचार आणि शिक्षणात खंड पडू नये यासाठी अमेरिकेतील सेव्हन लाईफ संस्थेने ही मदत दिली आहे.
ठाणे, पालघर जिल्ह्यात हिमोफिलिया (रक्तस्रावी) आजाराचे ९०० हून अधिक रुग्ण आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. या अनुवांशिक आजारात रुग्णाच्या शरीरातील रक्त गोठण्याची प्रक्रिया कार्यरत नसते. त्यामुळे एखादी जखम झाली तर तिच्यातून सतत रक्त वाहत असते. यामुळे त्याच्या जीविताला धोका असतो. त्याच्यावर सतत उपचार करावे लागतात. खासगी रुग्णालयात यावर मोठा खर्च येतो. जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र यावर मोफत उपचार केले जातात. येथे त्यांच्यावर रिप्लेसमेंट थेरपीद्वारे उपचार केले जातात, ज्यात आवश्यक घटक शरीरात दिले जातात. शरीरात रक्त गोठवणारे घटक बाहेरून दिले जातात. या आजाराच्या विद्यार्थ्यांना मोठ्या कष्टाने शिक्षण घ्यावे लागते. त्यांना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी अमेरिकेतील सेव्हन लाईफ ही आंतरराष्ट्रीय संस्था आर्थिक मदत करते. सोमवारी (ता. २९) संस्थेने २७ रुग्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला ३४ हजार रुपयांची मदत दिली. संस्थेच्या कॉर्डिनेटर उषा पार्थसारथी यांच्या उपस्थितीत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, डॉ. बाळकृष्ण खंडागळे, संस्थेच्या उषा पार्थसारथी, इतर पदाधिकारी आणि रुग्ण, विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती संस्थेचे रामू गडकर यांनी दिली.

आजाराची मुख्य लक्षणे व उपचार
जखमेनंतर जास्त वेळ रक्तस्त्राव होणे, सांध्यांमध्ये वेदना, सूज, हालचाल कमी होणे, नाक किंवा हिरड्यांमधून वारंवार रक्त येणे, स्नायूंमध्ये रक्तस्त्राव होऊन सूज येणे, अस्पष्ट आणि मोठे मुकामार दिसणे आदी आहेत. हा एक दुर्मिळ आजार असला तरी, योग्य वेळी निदान आणि उपचाराने रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो

सेव्हन लाईफ ही अमेरिकन संस्था असून २५ वर्षांपासून भारतातील गरीब, गरजू हिमोफिलिया ग्रस्तांना मदत करण्याचे काम करते. सहा हजाराहून अधिक हिमोफिलिया ग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करत आहे.
- उषा पार्थसारथी, कॉर्डिनेटर, सेव्हन लाईफ

फोटो : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते शैक्षणिक मदतीसाठी धनादेश देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Harish Rana Euthanasia: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालं होतं? इच्छामरण म्हणजे काय? भारतात कायदा काय सांगतो अन् कोणते देश मान्यता देतात?

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT