मुंबई

महापौर युतीचाच...

CD

महापौर युतीचाच...
नाराजीवर संयम, संवाद आणि समजुतीचा मार्ग ः रविंद्र चव्हाण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ ः कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी, युती आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट आणि संतुलित भूमिका मांडली आहे. काही प्रभागांत त्यांच्यासमोर कोणताही प्रतिस्पर्धी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रक्रिया कुठल्याही दबावातून झालेली नसून, त्या भागातील सर्व कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी एकमताने घेतलेला निर्णय असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
या उमेदवार चांगल्या आहेत, काम करण्याची क्षमता आहे आणि त्या भागात स्वीकारार्ह आहेत, या दृष्टिकोनातून सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला. या निर्णयात सहभागी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो, असे चव्हाण म्हणाले. युतीच्या भूमिकेबाबत बोलताना चव्हाण यांनी ठामपणे सांगितले की, कल्याण-डोंबिवलीत महापौर हा महायुतीचाच होईल. त्यामुळे अनेक ठिकाणी विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनीही व्यापक राजकीय वास्तव लक्षात घेऊन महायुतीला थोडाफार पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. निवडणुका चांगल्या, शांत आणि सकारात्मक वातावरणात पार पडणे गरजेचे आहे. त्यासाठी जे कोणी सहकार्य करत आहेत, त्यांचेही मी आभार मानतो, असे ते म्हणाले.
संभाजीनगर प्रकरणाचा उल्लेख करताना चव्हाण यांनी सांगितले की, या विषयात पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वतः लक्ष घालत आहेत. सध्या ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून, उमेदवारी न मिळाल्यामुळे काही ठिकाणी नाराजी असणे स्वाभाविक आहे. मात्र भाजपचा कार्यकर्ता हा समर्पित भावनेने काम करणारा असल्याने, संवादातून आणि समजुतीने ही नाराजी दूर केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यकर्ता आमच्यासाठी महत्त्वाचा
पक्ष मोठा आहे, इच्छुकही अनेक आहेत. प्रत्येकाला उमेदवारी देता येत नाही, पण प्रत्येक कार्यकर्ता आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे कुणालाही दुर्लक्षित न करता सर्वांची समजूत काढली जाईल, असे सांगत चव्हाण यांनी नेतृत्वाची संयमी आणि समन्वयाची भूमिका अधोरेखित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम'', बारामती विमान अपघाताबाबत AAIB कडून स्पष्टीकरण

JEE Main Exam Result : जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील माधव विराडिया अव्वल

Nagpur Property Tax : नागपूरकरांच्या खिशाला कात्री लागणार? निवडणूक होताच मनपा मालमत्ता कर वाढण्याच्या तयारीत

Dhule News : धुळे-नंदुरबारमध्ये वीजबिलाच्या जाचातून कायमची मुक्ती! १८ हजार घरांवर दिमाखात उभे राहिले 'मिनी पॉवर हाऊस'

भिवंडी महापालिकेत महापौर-उपमहापौर निवडणुकीची रंगत! महापौरपदावर ९ जणांची दावेदारी, उपमहापौरपदासाठी ६ इच्छुक, पाहा यादी...

SCROLL FOR NEXT