मुंब्र्यात सर्वाधिक २६९ मतदान केंद्रे
प्रशासनाचे कडेकोट नियोजन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता अवघे १५ दिवस उरले असून, महापालिका प्रशासनाने मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. पालिका क्षेत्रातील ३३ प्रभागांमध्ये एकूण २,०१३ मतदान कक्ष उभारले जाणार आहेत. यामध्ये मुंब्रा प्रभाग समितीत सर्वाधिक २६९ केंद्रे, तर उथळसर प्रभाग समितीत सर्वात कमी १५८ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी ठाण्यात एकूण १६ लाख ४९ हजार ८६७ मतदार आपला हक्क बजावतील. मतदारांना सुलभ आणि सुरक्षितपणे मतदान करता यावे, यासाठी प्रभागनिहाय मतदारसंख्येनुसार केंद्रांची विभागणी करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेसाठी तळमजल्यावर १,२०७ कक्ष, पार्टीशन स्वरूपातील ३६१ कक्ष, मंडपांमध्ये ४०३ कक्ष, तर पहिल्या मजल्यावर ४२ कक्ष ठेवण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला व आजारी मतदारांना अडचण होऊ नये, यासाठी तळमजल्यावर अधिक कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रांची रचना करताना ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गर्भवती महिलांच्या सोयीचा विशेष विचार करण्यात आला आहे. त्यानुसार जास्तीत जास्त केंद्रे ही तळमजल्यावर ठेवण्यात आली आहेत.
मतदारांना पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात मतदान करता यावे, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. केंद्रांवर पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही आणि सर्व आवश्यक सोयीसुविधा सज्ज राहतील, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
तळमजल्यावर : १,२०७ कक्ष
मंडपांमध्ये : ४०३ कक्ष
पार्टीशन स्वरूपात : ३६१ कक्ष
पहिल्या मजल्यावर : फक्त ४२ कक्ष
मतदान केंद्रांचा तपशील
प्रभाग समिती मतदान केंद्रांची संख्या
मुंब्रा २६९ (सर्वाधिक)
माजिवडा-मानपाडा २६६
कळवा २६३
दिवा २५५
लोकमान्यनगर-सावरकरनगर २४२
नौपाडा-कोपरी २१४
वर्तकनगर १८६
वागळे १६०
उथळसर १५८ (सर्वात कमी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.