मुंबई

अपेक्षांची नवी पहाट

CD

नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ३१ : घड्याळाच्या काट्यांबरोबर २०२५ हे वर्ष इतिहासात जमा होत असताना, उल्हासनगरसाठी हे वर्ष केवळ तारखांचे नव्हते; तर संघर्ष, बदल, अस्वस्थता आणि नव्या अपेक्षांनी भरलेले होते. रस्त्यांवरील गर्दी, राजकीय बैठका, आंदोलनांची धग, प्रशासकीय निर्णय आणि निवडणुकीची धामधूम यामुळे शहराचे संपूर्ण वर्ष वेगळी ओळख निर्माण करणारे ठरले.
राजकारणातील धक्कादायक प्रवेश-निर्गम, घराणेशाहीविरोधात उफाळलेला जनरोष, निवडणुकीच्या रणधुमाळीत अडकलेले प्रशासन आणि विकासाच्या प्रतीक्षेत असलेला सामान्य नागरिक. २०२५ हे वर्ष उल्हासनगरसाठी केवळ सरलेले वर्ष नव्हते, तर शहराच्या नाडीवर दाब देणारे, प्रश्न विचारणारे आणि नव्या अपेक्षा निर्माण करणारे ठरले. या साऱ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी महापालिका प्रशासन, विशेषतः आयुक्त मनीषा आव्हाळे यांचा कार्यकाळ सातत्याने चर्चेत राहिला. आता २०२६ च्या उंबरठ्यावर उभा असलेला उल्हासनगर एकच प्रश्न विचारतो आहे, हे वर्ष बदल घडवणार की तेच प्रश्न पुढे नेणार?
२०२५ हे वर्ष उल्हासनगरच्या इतिहासात अस्वस्थता, संघर्ष आणि अपेक्षांनी भरलेले वर्ष म्हणून नोंदले जाईल. वर्षाच्या सुरुवातीपासूनच शहरातील राजकीय वातावरण तापलेले होते. पक्षप्रवेश, युती-आघाड्यांतील फूट, मध्यरात्रीचे राजकीय निर्णय आणि घराणेशाहीविरोधात तळागाळातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली उघड नाराजी यामुळे राजकारण थेट रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले. अनेक प्रभागांमध्ये “स्थानिकाला संधी द्या” या मागणीसाठी आंदोलने झाली, तर आयात उमेदवारांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
या साऱ्या राजकीय गदारोळात महापालिका निवडणुकीची तयारी हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या कार्यकाळात निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशिक्षण वर्ग, आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांवर स्पष्ट जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. राजकीय दबावाच्या वातावरणातही नियम आणि शिस्त यांवर ठाम राहण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्याचे चित्र दिसून आले.
आता २०२६मध्ये महापालिका निवडणूक ही केवळ सत्ताबदलापुरती मर्यादित न राहता, शहराच्या विकासदिशेचा निर्णय करणारी ठरणार आहे. पुढील काळात नव्या सत्तासमीकरणांतून नागरिकांच्या अपेक्षांना न्याय मिळतो का? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही २०२५ महत्त्वाचे ठरले. निवडणूक काळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस यंत्रणेसोबत समन्वय साधत विशेष मोहिमा, कडक बंदोबस्त आणि संवेदनशील भागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. काही घटनांमध्ये तत्काळ कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले, मात्र नागरिकांमधील असुरक्षिततेची भावना पूर्णतः दूर झाली नसल्याचेही वास्तव आहे.

दैनंदिन प्रश्नांची आव्हाने
नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांनी प्रशासनासमोर वर्षभर सातत्याने आव्हाने उभी केली. खड्डेमय रस्ते, पाणीपुरवठ्याच्या तक्रारी, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव यावर नागरिकांचा रोष स्पष्टपणे दिसून आला. स्वच्छता मोहिमा, अतिक्रमण हटाव, करवसुली आणि प्रशासकीय शिस्त यावर भर देण्यात आला. काही भागांत हालचाली जाणवल्या, तरी ‘तात्पुरते उपाय नव्हे, कायमस्वरूपी तोडगा हवा’ ही नागरिकांची अपेक्षा पूर्ण झाली नसल्याची भावना कायम राहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy मध्येही दिसली 'पांड्या पॉवर'; चौकार - षटकारांची बरसात करत झळकावली शतकं, संघाचाही मोठा विजय

Maharashtra Government Decision : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! घरफाळा, पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलत, नव्याने शासन निर्णय जारी

Nanded News : किनवट येथे विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवले; मृत्यूपूर्वी आई-वडिलांविषयी सोशल मीडियावर भावनिक स्टेटस!

Thane Water Supply: नववर्षाच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई झळ, ठाण्यात शुक्रवारी पाणीपुरवठा योजनेचा शटडाऊन

Ladki Bahin Yojana: पटकन् मोबाईल चेक करा, लाडक्या बहिणींचे पैसे आले; किती हप्ते जमा?

SCROLL FOR NEXT