मुंबई

मिरा-भाईंदरमध्ये बंडखोरीचे ग्रहण

CD

मिरा-भाईंदरमध्ये बंडखोरीचे ग्रहण
भाजपच्या १३ माजी नगरसेवकांचे अपक्ष अर्ज; नेत्यांची डोकेदुखी वाढली
भाईंदर, ता. ३१ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने ‘नवे चेहरे’ देण्याचा प्रयोग केला; मात्र हा प्रयोग पक्षाच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या २० पैकी १३ माजी नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. भाजपची ‘एकहाती सत्ते’ची गणिते या बंडखोरीमुळे बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपने आपल्या ६१ माजी नगरसेवकांपैकी २० जणांना यंदा उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी युवा मोर्चाच्या १० पदाधिकाऱ्यांसह नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाचा हा निर्णय वरिष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांच्या पचनी पडलेला नाही. मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे बंडखोरीचा आकडा स्पष्ट झाला नव्हता; मात्र बुधवारी जाहीर झालेल्या अधिकृत यादीने भाजप नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

भाजपसमोर दुहेरी संकट
१. बंडखोरांचे आव्हान : १३ माजी नगरसेवक आणि अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
२. शिवसेनेची टक्कर : भाजप-शिवसेना युती न झाल्याने अनेक जागांवर शिवसेनेचे आधीच कडवे आव्हान आहे, त्यात आता घरच्याच बंडखोरांनी शड्डू ठोकल्याने मतांचे विभाजन होण्याची भीती आहे.

काँग्रेसलाही बंडखोरीची झळ
भाजपप्रमाणेच काँग्रेसमध्येही काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. काँग्रेसने चार माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली असली तरी त्यांनी बंड केलेले नाही; मात्र पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी आणि जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांच्यासह काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष अर्ज भरून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप : २० पैकी १३ माजी नगरसेवकांची बंडखोरी
काँग्रेस : प्रदेश प्रतिनिधी आणि प्रवक्त्यांचे अपक्ष अर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Crime : पद्मश्री नामांकित डॉक्टरांचा तपास; अवैध किडनी व्यवहारातील मोठे खुलासे; चंद्रपूर पोलिसांची विशेष कारवाई सुरु!

Gold Rate: २०२६ मध्ये सोन्याचा दर २ लाखांपर्यंत पोहोचणार? ज्योतिषांचं भविष्याबद्दल भाकित, दर वाढीचे स्पष्ट संकेत

Savalyachi Janu Savali मध्ये मोठा ट्विस्ट; असं समोर येणार सावलीच्या आवाजाचं सत्य; नेटकरी खुश, म्हणतात-

Elon Musk’s big hint for Content Creators : इलॉन मस्क करणार ‘कंटेट क्रिएटर्स’ना मालामाल!, ‘Youtube’ पेक्षा जास्त पैसा 'X' देणार

Dombivli Politics: ज्यांच्याशी वाद, त्यांच्याच सोबत रणनीती! डोंबिवलीत पॅनल २२ मधील ‘राजकीय गणित’ उघड

SCROLL FOR NEXT