मुंबई

मालमत्ता करातून कोटीची उड्डाणे

CD

वाशी, ता. ५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असणाऱ्या मालमत्ता कर वसुली करण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने कंबर कसली आहे. यंदाही पालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या डिसेंबरच्या अखेरपर्यंत वसुली ध्येय पूर्तीकडे वाटचाल सुरू केल्याचे पहावयास मिळत आहे. पालिकेने डिसेंबर अखेरपर्यंत ६०० कोटींची वसुली केली आहे. पालिकेने एक हजार कोटीं कर वसुलीचे उद्दिष्टय डोळया समोर ठेवले असून यंदा पालिका कोटींची झेप घेण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंत ४४८ कोटी ९५ लाख मालमत्ता कर वसूल करण्यात आला होता. २०२४-२५ मध्ये ५६९ कोटी ४५ लाख कर वसूल करण्यात आला होता, पण २०२५-२६ या वर्षात मात्र ६०० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर वसूल करण्यात आलेला आहे. २०२४-२५ च्या तुलनेत ३० कोटीपेक्षा अधिक मालमत्ता कर हा वसूल करण्यात आला आले.

आर्थिक राजधानी मुंबईच्या सीमेवर वसलेली, नवी मुंबई ही एक मोठी महापालिका आहे. या पालिका क्षेत्राअंतर्गत ऐरोली, बेलापूर, दिघा, घणसोली, कोपरखैरणे, नेरुळ, तुर्भे आणि वाशी अशा आठ नोडचा समावेश आहे. पालिका अंतर्गत नोंदणीकृत तीन कोटी ९ हजार २९६ मालमत्ता आहेत. यापैकी दोन कोटी ६३ लाख ९७ निवासी, तर ६० हजार ८५ अनिवासी मालमत्ता आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये सहा हजार ११४ मालमत्ता आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ता कर हा नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकेने मागील वर्षी अभय योजना राबवली आहे. मोठ्या सोसायट्या, इमारतींमधील रहिवासी आणि व्यावसायिकांनी महापालिकेने वारंवार कळवूनही मालमत्ता कर भरलेला नाही. त्यानुसार मालमत्ता कर वसुलीवर पालिकेकडून भर दिला जात आहे, तर पालिकेकडून जप्तीच्या देखील नोटिसा काढण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Laxman Hake : सुनेत्रावहिनींना विधानपरिषदेवर बिनविरोध पाठवा; बारामतीची निवडणूक आम्ही ठामपणे लढविणार...

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

हा राया नाहीतर भलताच ! मालिकेतून 4 कलाकार बाहेर पडल्यानंतर आलेल्या नव्या ट्विस्टने प्रेक्षक चक्रावले

दोन बहिणी, दोन मालिका, झी मराठीच्या 'या' नायिका आहेत सख्ख्या बहिणी; गाजवतायत टीव्ही इंडस्ट्री, तुम्ही ओळखल्या का?

SCROLL FOR NEXT