मुंबई

३४७ घरकुलांचे काम अपूर्णच

CD

३४७ घरकुलांची कामे अपूर्ण
पहिला हप्ता मिळूनही बांधकामाला प्रतीक्षा
विरार, ता. ३१ (बातमीदार) : वसई तालुक्यात विविध शासकीय योजनांतर्गत घरकुलांचा लक्षांक पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले, तरी अद्याप ३४७ घरकुलांचे काम अपूर्णच असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. दुसरीकडे, पूर्ण झालेल्या १२० घरकुलांमध्ये लाभार्थ्यांनी उत्साहात गृहप्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत वसई तालुक्यात २३ आणि २४ डिसेंबरला घरकुल लाभार्थी संवाद अभियान (टप्पा-३) राबविण्यात आले. या अभियानांतर्गत तालुक्यातील पूर्ण झालेल्या ३२७ घरकुलांपैकी १२० लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळा अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. हक्काचे घर मिळाल्याने या कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकीकडे गृहप्रवेश होत असतानाच, दुसरीकडे ज्या ३४७ लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊनही काम सुरू केलेले नाही, त्यांच्याबाबत प्रशासकीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील २८२ आणि आदिवासी न्याय महाअभियानातील ६५ घरांची कामे तातडीने सुरू व्हावीत, यासाठी पंचायत समितीकडून पाठपुरावा केला जात आहे.

घरकुलांची स्थिती :
योजनेचे नाव एकूण लक्षांक पूर्ण घरकुले पहिला हप्ता मिळाला (काम अपूर्ण)
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) १,१०५ २८८ २८२
आदिवासी न्याय अभियान १८८ ४९ ६५
एकूण १,२९३ ३३७ ३४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शेगावचं गजानन महाराज मंदिर बंद राहणार? सोशल मिडियावरील 'त्या' मेसेजबाबत संस्थांकडून स्पष्टीकरण...

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या नजरा 'पीएम किसान' हप्त्याकडे; कधी जमा होणार 22 वा हप्ता? जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लाभार्थी

T20 World Cup: औपचारिकता गांभीर्याने पूर्ण करणार; भारताचा आज नेदरलँड्ससोबत टी-२० विश्वचषकचा अखेरचा साखळी सामना!

Gold Rate Today : तीन दिवसांत सोनं ₹6,500 तर चांदी ₹20,000 ने स्वस्त! भाव घसरले तरीही दागिने खरेदीत मंदी; जाणून घ्या आजचा ताजा भाव

Raigad Ropeway रायगडला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, रोपवे सेवा ६ दिवसांसाठी बंद

SCROLL FOR NEXT