मुंबई

प्रकल्पांचा प्रवास अडखळत

CD

प्रकल्पांचा प्रवास अडखळत
ठाण्यात अनेक प्रकल्प आजही अपूर्ण
राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : कोरोना काळानंतर डळमळीत झालेली ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती आणि रखडलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प यामुळे ठाणेकरांना आजही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी सरकारकडून पालिकेला शेकडो कोटींचा निधी प्राप्त झाल्याने पालिकेला आधार मिळला असून, या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली. यामध्ये शहर सुशोभीकरण, सिमेंट रस्ते, सार्वजनिक शौचालय, गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव क्रीडागृह आदींसह काही महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला अंतर्गत मेट्रो, बाळकूम ते गायमुख खाडीकिनारी मार्ग, उपवन ते हिरानंदानी मेडोज रस्ता काम आदी कामांना मंजुरी मिळाली आहे; मात्र अद्याप हे प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झालेले नाहीत. त्यामुळे नव्या वर्षात या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे.

ठाणे पालिका क्षेत्रात होणारी वाहतूक कोंडी, उड्डाणपुलांवरील मास्टिकचे फुगवटे, घोडबंदर भागात उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलांसह आजूबाजूच्या परिसरात पाणीटंचाईची समस्या आजही भेडसावत आहे. ही पाणीसमस्या सोडविण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत, असा दावा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र आजही समस्यांचा डोंगर कायम असल्याचे दिसून येत आहे. तसेच मेट्रो, घोडबंदर सेवारस्ता मुख्य रस्त्यात विलीन करणे, बोरिवली बोगदा, कोस्टल रोड आदींसह अन्य काही प्रकल्प सुरू आहेत, तर पीपीपी प्रकल्पांना चालना मिळू शकलेली नाही. अशातच दुसरीकडे ठाण्याला एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्री लाभल्यानंतर ठाण्यात काही महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना मिळाली होती. यात शहर सुशोभीकरणाची १४१ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. ठाण्यातील रस्त्यांची ६०५ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. गडकरी रंगायतनचा कायापालट करण्यात आला.

डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह नूतनीकरण, ठाणे महापालिका शाळेच्या इमारतींचे मजबुतीकरण आणि नूतनीकरण ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांचे नूतनीकरण, ठाणे पशुपालन गृह उभारणी, कळवा येथील भूमिपुत्र मैदानावर क्रीडासंकुल आणि कळवा नाट्यगृह उभारणी या प्रकल्पांसाठी निधी प्राप्त झाला असून, काही कामांच्या निविदा अंतिम झाल्या आहे. काही कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे नव्य वर्षात ठाणेकर, कळवेकरांना मनोरंजनाची ठिकाणे मिळणार असून, शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्गखोल्या व सुसज्ज अशा शाळा मिळणार आहेत.

सरत्या वर्षातील जमेची बाजू
शहर सुशोभीकरण : १४१ कोटींची कामे पूर्ण
रस्ते विकास : ६०५ कोटींच्या रस्ते दुरुस्ती व सिमेंट कामांना गती
सांस्कृतिक वारसा : गडकरी रंगायतनचा कायापालट आणि दादोजी कोंडदेव क्रीडागृहाचे नूतनीकरण
नियोजित प्रगती : कळवा नाट्यगृह, पशुपालन गृह आणि महापालिका शाळांच्या मजबुतीकरणासाठी निधी प्राप्त असून, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

प्रकल्प अद्याप कागदावरच
प्रकल्प सद्य:स्थिती प्रगती
बोरिवली टनेल ११.८४ किमी लांबीचा हा प्रकल्प रखडलेलाच आहे. केवळ २० टक्के काम पूर्ण.
ठाणे रिंग मेट्रो १२,२०० कोटींचा हा प्रकल्प ऑगस्ट २०२४ मध्ये मंजूर झाला. अद्याप प्रत्यक्षात कामाला सुरुवात नाही.
कोस्टल रोड १३.४५ किमीचा बाळकूम-गायमुख मार्ग १० वर्षांपासून कागदावरच आहे. अद्याप कामाचा पत्ता नाही.
घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीन करण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. ७० टक्के काम पूर्ण; नवीन मुदत फेब्रुवारी २०२६.
उपवन-मेडोज रस्ता निविदा झाली असली तरी वर्क ऑर्डर आता कुठे दिली गेली आहे. प्रत्यक्षात काम शून्य.

आश्वासने कायम
पाणीटंचाई : घोडबंदर परिसरात आजही पाणी पेटलेले आहे. वाढीव पाणी देण्याचे आश्वासन पूर्ण झालेले नाही.
वाहतूक कोंडी : उड्डाणपुलांवरील मास्टिकचे फुगवटे आणि नियोजनशून्य रस्तेकामांमुळे कोंडीचा फास कायम आहे.
कचरा समस्या : डम्पिंग आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक जटिल झाला आहे.
आरोग्य : शासकीय रुग्णालयांचा दर्जा आणि आरोग्य सुविधांची कमतरता आजही ठाणेकरांना जाणवतेय.

Gold Rate: २०२६ मध्ये सोन्याचा दर २ लाखांपर्यंत पोहोचणार? ज्योतिषांचं भविष्याबद्दल भाकित, दर वाढीचे स्पष्ट संकेत

Savalyachi Janu Savali मध्ये मोठा ट्विस्ट; असं समोर येणार सावलीच्या आवाजाचं सत्य; नेटकरी खुश, म्हणतात-

Elon Musk’s big hint for Content Creators : इलॉन मस्क करणार ‘कंटेट क्रिएटर्स’ना मालामाल!, ‘Youtube’ पेक्षा जास्त पैसा 'X' देणार

Dombivli Politics: ज्यांच्याशी वाद, त्यांच्याच सोबत रणनीती! डोंबिवलीत पॅनल २२ मधील ‘राजकीय गणित’ उघड

Vijay Hazare Trophy मध्येही दिसली 'पांड्या पॉवर'; चौकार - षटकारांची बरसात करत झळकावली शतकं, संघाचाही मोठा विजय

SCROLL FOR NEXT