मुंबई

बेशिस्त वाहनचालकांमुळे वडखळ–अलिबाग मार्गावर कोंडी

CD

बेशिस्त वाहनचालकांमुळे वडखळ-अलिबाग मार्ग ठप्प
रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका
पोयनाड, ता. ३१ (बातमीदार) : नववर्षाच्या स्वागतासाठी अलिबाग व मुरूडकडे येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांच्या बेशिस्त वाहनचालकांमुळे वडखळ-अलिबाग राज्य मार्गावर बुधवारी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आधीच अरुंद आणि एकेरी स्वरूपाचा असलेला हा राज्य मार्ग मागील काही वर्षांपासून रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यातच सुट्टीचे दिवस आणि वाढती वाहनसंख्या यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बुधवारी अलिबागच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांनी वाहनांच्या दोन-दोन रांगा लावल्याने पोयनाड परिसरात वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली होती. शहाबाज, पांडवादेवी ते पोयनाड या पट्ट्यात एकेरी रस्त्यावर तीन-तीन वाहनांच्या रांगा, ओव्हरटेक करण्याची चढाओढ आणि घुसखोरी यामुळे कोंडी अधिकच वाढली. या गोंधळाचा सर्वात मोठा फटका रुग्णवाहिकांना बसला. पेण किंवा पनवेल येथून अलिबागकडे रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहिल्याच्या घटना समोर आल्या.
स्थानिक नागरिकांसह शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. वेळेत पोहोचणे अशक्य झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. पर्यटकांची संख्या वाढली की हा मार्ग ठप्प होतो, अशी तक्रार स्थानिकांकडून सातत्याने केली जात आहे.
बॉक्स
रुग्णवाहिकांची वाट अडलेली
बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिस व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी पोयनाड परिसरातील नागरिकांनी केली आहे. पर्यटनाला विरोध नाही, मात्र त्यासाठी स्थानिकांचे आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन जीवन वेठीस धरले जाऊ नये, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

चौकट
अलिबाग वा पेणला जाणे झाले अवघड
वडखळ-अलिबाग मार्गावरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे पोयनाड परिसरातून अलिबाग किंवा पेणला जाणे कठीण झाले होते. दुचाकीस्वारांनाही कोंडी आणि बेशिस्त वाहनचालकांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT