तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय मंडळीही सज्ज झाली आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरासह गाव, गावठाणसह झोपडपट्टी भागात नेत्यांचे खास कार्यक्रम, भेटीगाठी आणि बंद दाराआड चर्चा रंगत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही वर्षअखेरची संधी राजकीय नेत्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी स्नेहमेळावे, तर काही नेत्यांकडून धार्मिक स्थळांना भेटी देत नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे, झगमगाटी पार्ट्यांपासून दूर राहत ‘साधेपणा’ दाखवण्यावर काही नेत्यांचा भर असल्याचे चित्र आहे.
मतदारांमध्ये सकारात्मक संदेश जावा, यासाठी अनेक नेते समाज माध्यमांवरून शुभेच्छा देण्याची तयारी करत आहेत. नव्या वर्षात विकास, रोजगार आणि महागाईसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले जात आहेत, मात्र बंद दाराआड राजकीय रणनीती आणि समीकरणांची आखणी सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
३१ डिसेंबर हा केवळ जल्लोषाचा दिवस नसून, राजकीय दृष्टिकोनातून ‘पुढील वर्षाची दिशा ठरवणारा दिवस’ ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने काही राजकीय मंडळींकडून मतदारांसाठी ३१ डिसेंबरच्या पार्टीचे आयोजन केले जात आहे. डीजे, जेवणावळी, थंड पेये आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या जल्लोषाच्या आड राजकीय गणिते आखली जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पार्ट्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘नवीन वर्षाच्या शुभेच्छा’ देण्याच्या नावाखाली मतदारांशी थेट संपर्क, उपस्थिती वाढवणे आणि वातावरण आपल्या बाजूने वळवण्याचा हा प्रयत्न दिसत आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या आड पार्टी
निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. काही ठिकाणी स्थानिक कार्यकर्तेच या पार्टीचे आयोजन करत असल्याचा दावा केला जात असला, तरी पडद्यामागे राजकीय पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. काहींनी आचारसंहितेचा भंग होऊ नये, म्हणून शहराबाहेरील फार्महाऊसकडे कार्यकर्त्यांसह मतदारराजाला खूश करण्यासाठी पार्टीचे आयोजन केले आहे.
घरगुती खानावळसाठी चांगले दिवस
राजकीय पार्ट्याचा फायदा घरगुती जेवण बनविणाऱ्या खानावळला अधिक होत आहे. त्यात आगरी भाकरीसह चिकन, मटणला अधिक मागणी आहे. सध्या घरगुती जेवणाला अधिक मागणी वाढली आहे. त्यामुळे घरगुती खानावळसाठी चांगले दिवस आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.