मुंबई

स्वच्छ सर्वेक्षणासाठी नियोजनबद्ध व शिस्तबद्ध काम आवश्यक

CD

स्वच्छ सर्वेक्षणासाठी नियोजनबद्ध काम आवश्यक
आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : स्वच्छ सर्वेक्षण हे केवळ गुणांकनापुरते मर्यादित नसून शहराच्या एकूण जीवनमानाशी निगडीत आहे. घनकचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा विलगीकरण, घराघरातून कचरा संकलन, सार्वजनिक स्वच्छता व्यवस्था आणि कचरा प्रक्रिया या प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध व शिस्तबद्ध काम करणे आवश्यक आहे. नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे ओळखून क्षेत्रीय पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणकरिता पालिकेच्या वतीने प्रभाग समितीनिहाय टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून याचे सदस्य म्हणून अंतर्गत नोडल अधिकारी नेमले आहेत. या नोडल अधिकाऱ्यांसाठी मंगळवारी (ता. ३०) ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, मधुकर बोडके, दीपक झिंजाड, मिताली संचेती, अनघा कदम, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते.

नागरी सहभाग महत्वाचा
शहर स्वच्छतेत गुणवत्ता, सातत्य आणि नागरिक सहभाग या तीन घटकांवर भर देत त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले. नागरिकांचा सक्रिय सहभाग हा स्वच्छ सर्वेक्षणातील महत्त्वाचा घटक असून जनजागृती, नागरिक अभिप्राय, तक्रार निवारण यंत्रणा प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. स्वच्छता सेवकांचे आरोग्य, सुरक्षितता व सन्मान जपणे आणि आधुनिक यांत्रिकीकरणाचा योग्य वापर करून कामाची गुणवत्ता वाढवावी, असेही आयुक्तांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

SCROLL FOR NEXT