मुंबई

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सज्ज

CD

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सज्ज
मतदान यंत्रांच्या प्रथम स्तर तपासणी कार्यवाहीची आयुक्तांकडून पाहणी
वाशी, ता. ३१ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विषयक कामकाजाला वेग आला असून, निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांची (ईव्हीएम) प्रथम स्तर तपासणी (एफएलसी) वारकरी भवन येथील स्ट्राँग रूममध्ये सुरू आहे. या तपासणी प्रक्रियेची महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथे सुरू असलेल्या संपूर्ण कार्यप्रणालीची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या पाहणी प्रसंगी ईव्हीएम मशीन विषयक कार्यवाहीचे नोडल अधिकारी तथा उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, वाहन व्यवस्थेचे नोडल अधिकारी व परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर, तसेच कार्यकारी अभियंता प्रविण गाडे उपस्थित होते. आयुक्तांनी मतदान यंत्रांची तपासणी ही अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची प्रक्रिया असून, ती पूर्णपणे पारदर्शक, अचूक आणि नियमानुसार पार पाडली जावी, असे स्पष्ट निर्देश दिले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण २८ प्रभागांमध्ये १११ जागांसाठी निवडणूक होत असून, यासाठी ११४८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी आवश्यक असलेली मतदान यंत्रणा राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यंत्रांची प्रथम स्तर तपासणी ही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या समक्ष करण्यात येत असून, प्रत्येक यंत्र कार्यक्षम आहे की नाही, याची काटेकोर तपासणी केली जात आहे. या प्रक्रियेमुळे निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हता आणि पारदर्शकता अधिक दृढ होणार आहे.
..............
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
दरम्यान, उद्या १ जानेवारीपासून निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पहिल्या प्रशिक्षणास विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे सुरुवात होणार आहे. हे प्रशिक्षण सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक असल्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षणास अनुपस्थित राहणाऱ्या किंवा आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि यशस्वीरीत्या पार पडावी, यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून, प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule: मुंबई इ़ंडियन्ससाठी 'हे' वेळापत्रक लकी ठरणार! २०१९ नंतर जुळून आलाय योगायोग, सहावी ट्रॉफी आपलीच

Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

Latest Marathi News Live Update : एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याची सांगता

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT