मुंबई

कर्मचाऱ्यांकडूनच पाच लाखांचा डल्ला

CD

अंबरनाथ, ता. ३१ (वार्ताहर) : शहरातील आनंदनगर एमआयडीसी परिसरातील आर. के. इंजिनीअरिंग कंपनीत विश्वासाने कामावर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांनीच कंपनीला लाखो रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीचे स्टोअर व्यवस्थापक नंदकुमार पांडुरंग पवार आणि डिस्पॅच सुपरवायझर सागर मेहेर यांनी पदाचा गैरवापर करत संगनमताने सुमारे पाच लाख ३४ हजार रुपये किमतीच्या मालाचा अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कंपनीच्या प्रतिनिधी प्रियांका हरिश्चंद्र जाधव (रा. बदलापूर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपहार मे ते नोव्हेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला. आरोपींनी कंपनीच्या साठ्यातील मौल्यवान समजले जाणारे तीन लाख २२ हजार रुपये किमतीचे ‘एसएस ३०४ एम नट’; तसेच दोन लाख १२ हजार रुपये किमतीचे ‘प्लेन वॉशर्स’ असा एकूण पाच लाख ३४ हजार रुपयांचा माल लंपास केला. कंपनीच्या अंतर्गत तपासणीत साठ्यात मोठी तफावत आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनीच कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट होताच व्यवस्थापनाने तातडीने पोलिसांत धाव घेतली. तक्रारीची गंभीर दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी नंदकुमार पवार आणि सागर मेहेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या मालमत्तेचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस सखोल तपास करत असून, चोरीला गेलेला माल हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चौरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

SCROLL FOR NEXT