मुंबई

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; एक जखमी

CD

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; एक जखमी
अलिबाग, ता. ३१ (वार्ताहर) ः तालुक्यातील मांडवा येथून अलिबागकडे जाणाऱ्या दुचाकीची धडक रस्त्याच्या बाजूला असलेल्या फलकाच्या खांबाला लागली. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. एकाला नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसरा गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना मंगळवारी (ता. ३०) रात्री चोंढी येथील पुलाजवळ घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षित पालवणकर व शिवम गुप्ता हे दुचाकीवरून मांडवा ते अलिबाग असा प्रवास करीत होते. अलिबागकडे जात असताना रात्री चोंढी येथे पुलाजवळ त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खांबाला दुचाकीची जोरदार धडक लागली. या धडकेत दोघांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच मांडवा पोलिस आणि स्थानिकांनी धाव घेतली. जखमींना तत्काळ उपचारासाठी अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात पाठवले; मात्र शिवम गुप्ता याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात रवाना करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Pune News: नागपूर खंडपीठाचा निर्णय! आरटीई प्रवेशातील अंतराची अट स्थगित; पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी, काय आहे आदेश..

Harish Rana : इंजिनिअर होण्याचं स्वप्न अपुरं… १३ वर्षे कोमात झुंजलेल्या मुलाला इच्छामरण; वडिलांच्या डोळ्यांत अश्रू, शब्दही थरथरले…

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

30-Year Journey of Homemade Spice Business: कांडप यंत्रातून उभा राहिला स्वादाचा प्रवास; परळीच्या जाधव मसाल्याची ३० वर्षांची परंपरा

SCROLL FOR NEXT