महालक्ष्मी मंदिरात भाविकांचा महापूर
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या रांगा
कासा, ता. १ : सरत्या वर्षाला निरोप देत आणि २०२६ या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी डहाणूतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाचा उत्साह यामुळे पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, नाशिक आणि गुजरात राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी महालक्ष्मी गडावर दाखल झाले आहेत.
डहाणू परिसरातील महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून पर्यटनाचेही प्रमुख आकर्षण ठरत आहे. मंदिराजवळील भीम बांध, अशेरीगड, गंभीरगड, सासूचे नाक, कवडास आणि धामणी धरण या पर्यटनस्थळांवरही पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक भाविक नवीन वर्षात खरेदी केलेली नवीन वाहने पूजनासाठी देवीच्या दारी घेऊन येत असल्याने मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला आमचे पहिले प्राधान्य आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी दिली.
प्रशासकीय नियोजन आणि सुरक्षा
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
सुरक्षा व्यवस्था : गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुविधा : दर्शन रांगेत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याचे पाणी आणि विशेष व्यवस्थापनावर भर दिला जात आहे.
वाहतूक नियंत्रण : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्याने कासा पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.