मुंबई

राष्ट्रीय उद्यानात ३१ डिसेंबर साजरा

CD

राष्ट्रीय उद्यानात ३१ डिसेंबर साजरा
मुलांसह आजी-आजोबांनी केली गर्दी

कांदिवली, ता. १ (बातमीदार) : ३१ डिसेंबर म्हणजेच वर्षाअखेरचा दिवस अनेकांनी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात साजरा केला. व्याघ्र सफारी, सुगंधी उद्यान, गांधी टेकडी, निसर्ग माहिती केंद्र आणि कणेरी केव्हज अशी पर्यटनस्थळे फिरत लहान मुलांसह त्यांचे पालक, आजी-आजोबा यांनी राष्ट्रीय उद्यानाची सैर केली.
अनेक मुंबईकरांनी निसर्गाच्या सान्निध्यात ३१ डिसेंबर साजरा करणे पसंत केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गेट परिसरात बुधवारी सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेकांनी निसर्गाच्या सान्निध्यात बोटिंगचा, बसमधून व्याघ्र सफारीचा आनंद लुटला. तरुण-तरुणींनी बोचरी थंडी झेलत हिरव्यागार जंगलातून सायकलवरून फेरफटका मारला. पालकांनी मुलांसह झाडाखाली, नदीच्या काठी दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला. बोरे, आंबट चिंचा, मसाल्याच्या चिंचा, कैरीच्या खापा, काकडी, पेरू, मिठात उकडलेल्या शेंगा आणि चणे यांचा आनंद पर्यटकांनी घेतला. या वेळी अनेक पर्यटकांना सेल्फी घेण्याचा आनंद अनावर झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मॅच विनर खेळाडूची एन्ट्री; BCCI ने जाहीर केला बदल

Land Acquisition Payment To Farmers : नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार

Panchang 18 February 2026: आजच्या दिवशी श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शेगावचं गजानन महाराज मंदिर बंद राहणार? सोशल मिडियावरील 'त्या' मेसेजबाबत संस्थांकडून स्पष्टीकरण...

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या नजरा 'पीएम किसान' हप्त्याकडे; कधी जमा होणार 22 वा हप्ता? जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लाभार्थी

SCROLL FOR NEXT