मुंबई

आंब्याच्या बागेत शेवगा बहरला

CD

पालघरमध्ये मोरिंगा शेवगा लागवडीला सुवर्णसंधी
आंतरपिकातून वर्षाला दोन लाखांचा नफा
वाणगाव, ता. १ (बातमीदार) : निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोरिंगा जातीची शेवगा लागवड उत्पन्नाचा एक नवा आणि शाश्वत स्रोत ठरत आहे. वाडा तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी कोंडू पष्टे यांनी आंब्याच्या बागेत आंतरपीक म्हणून शेवग्याची यशस्वी लागवड केली असून, त्यातून वर्षाकाठी सुमारे दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

शेवग्याच्या फुलांकडे मधमाश्‍यांचे विशेष आकर्षण असते. कोंडू पष्टे यांच्या बागेत सध्या शेवगा बहरला असून, त्यावर मधमाश्‍यांचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. मधमाश्‍यांमुळे नैसर्गिक परागीभवन होऊन शेंगांची संख्या, आकार आणि दर्जा सुधारतो. मधमाश्‍यांच्या वावरामुळे फुलगळ कमी होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होत आहे. रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळल्यामुळे मधमाश्‍यांचे संरक्षण होऊन दर्जा सुधारला आहे.

शेवगा हे पीक कमी जागेत आणि कमी खर्चात येते. यंदा पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने नोव्हेंबरऐवजी डिसेंबरच्या अखेरीस बहर आला आहे.
१. आंतरपीक : आंब्याच्या बागेत १०×१० फूट अंतरावर शेवग्याची लागवड करता येते.
२. लागवड ते उत्पन्न : रोपे लावल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत उत्पादन सुरू होते.
३. शेंगांचे वैशिष्ट्य : मोरिंगा जातीची शेंग साधारण दोन फूट लांब असून, एका किलोत केवळ पाच-सहा शेंगा भरतात.
४. बाजारभाव : सध्या बाजारात ५० ते ५५ रुपये प्रति किलो असा दर मिळत असून, मे महिन्यापर्यंत हे उत्पादन सुरू राहते.

मुंबई-गुजरातची बाजारपेठ जवळ
शेवग्याचे औषधी महत्त्व ओळखून मुंबई आणि शेजारील गुजरात राज्यात याला मोठी मागणी आहे. कॅल्शियमने समृद्ध असलेल्या शेवग्याला शहरी भागात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच अशा व्यावसायिक पिकांकडे वळणे काळाची गरज बनली आहे.

नफा देणाऱ्या शेतीकडे वळा
मोरिंगा जातीचा शेवगा मला चांगले उत्पन्न देत आहे. मुख्य फळपिकासोबत आंतरपीक म्हणून शेवगा लावला तरी कुटुंबाचा वार्षिक खर्च सहज निघू शकतो. शेतकऱ्यांनी आता नफा देणाऱ्या शेतीकडे वळायला हवे, असा सल्ला प्रगतशील शेतकरी कोंडू पष्टे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT