मुंबई

नववर्षाची सुरुवात आगीच्या घटनांनी

CD

नववर्षाची सुरुवात आगीच्या घटनांनी
ठाण्यात तीन ठिकाणी आग, सहा जण थोडक्यात बचावले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : ठाणेकरांनी गुरुवारी (ता. १) मध्यरात्री नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले; मात्र दुसरीकडे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी ही रात्र धावपळीची ठरली. मध्यरात्री दोन ते पावणेतीन या अवघ्या पाऊण तासाच्या अंतरात शहरात आगीच्या तीन घटना घडल्या. यामध्ये सहा नागरिक थोडक्यात बचावले असून, वित्तहानी झाली आहे.
पहिली घटना मध्यरात्री दोन वाजता लुईसवाडी येथील ग्रीन रोडवरील सन मॅग्नेटिक बिल्डिंगमध्ये घडली. येथील पहिल्या मजल्यांवरील ओपन टेरेसमध्ये ठेवलेल्या बांबूंना अचानक आग लागली. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. दुसरी घटना दोन वाजून १० मिनिटांनी वागळे अग्निशमन केंद्रासमोरच घडली. कारमालक करणवीर सिंग हे आपली गाडी घेऊन जात असताना अचानक गाडीतून धूर येऊ लागला. प्रसंगावधान राखून त्यांनी गाडी बाजूला उभी केली आणि ते बाहेर पडले. समोरच अग्निशमन केंद्र असल्याने जवानांनी तातडीने धाव घेत १० मिनिटांत आग नियंत्रित केली. यामुळे कारमालक थोडक्यात बचावले. तिसरी आणि गंभीर घटना कोपरीतील ठाणेकरवाडी येथील श्री दत्त साई टॉवरमध्ये पावणेतीनच्या सुमारास घडली. १३व्या मजल्यावरील राजकुमार उधानी यांच्या घरातील बेडरूममधील इलेक्ट्रिक स्विच बोर्डला शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मॅच विनर खेळाडूची एन्ट्री; BCCI ने जाहीर केला बदल

Land Acquisition Payment To Farmers : नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार

Panchang 18 February 2026: आजच्या दिवशी श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शेगावचं गजानन महाराज मंदिर बंद राहणार? सोशल मिडियावरील 'त्या' मेसेजबाबत संस्थांकडून स्पष्टीकरण...

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या नजरा 'पीएम किसान' हप्त्याकडे; कधी जमा होणार 22 वा हप्ता? जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लाभार्थी

SCROLL FOR NEXT