मुंबई

माजी विद्यार्थ्यांचा क्रिकेट महोत्सव उत्साहात संपन्न

CD

आर. जी. काते चषकमध्ये ‘सौख्या इलेव्हन’चा विजयी झेंडा
माजी विद्यार्थ्यांचा क्रिकेट महोत्सव उत्साहात
ठाणे, ता. १ (बातमीदार) : बेडेकर महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी (ता. २८) पार पडलेली श्रीमान आर. जी. काते साहेब चषक ही माजी विद्यार्थ्यांची क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत माजी विद्यार्थ्यांचे एकूण १३ तर माजी विद्यार्थिनींचे चार संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन करीत सौख्या इलेव्हन संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले, तर कुलस्वामिनी इलेव्हन संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
खेळाडूंनी दाखवलेल्या खेळभावनेने आणि संघभावनेने उपस्थितांची मने जिंकली. ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता माजी विद्यार्थ्यांसाठी एक मोठे स्नेहसंमेलन ठरले. सुमारे ४०० माजी विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मैदानावर सुरू असलेल्या सामन्यांसोबतच विविध उपक्रम, भेटीगाठी आणि आठवणींमुळे संपूर्ण परिसरात उत्साही व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा समितीचे सदस्य, कार्यकारी समितीतील पदाधिकारी, स्वयंसेवक आणि अम्पायर यांनी मोलाचे योगदान दिले. माजी विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. या वेळी आयोजकांनी सांगितले, की माजी विद्यार्थी सेवा संस्था ही पुढील काळातही श्रीमान आर. जी. काते विद्यालय पंचक्रोशी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक उपक्रम राबविणार आहे. या क्रिकेट महोत्सवाने माजी विद्यार्थ्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

महिला गटात चुरशीचे सामने
महिला गटातही चुरशीचे सामने पाहायला मिळाले. झाशीची राणी संघाने विजेतेपद पटकावले, तर जिजाऊ क्वीन इलेव्हन संघाने उपविजेतेपद मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT