मुंबई

सराईत गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध

CD

उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) : उल्हासनगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. हिललाईन पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांत गुंतलेल्या सराईत तरुण आरोपीला थेट पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल गंभीर गुन्ह्यातील आरोपी साहिल गायसमुद्रे (वय २५, रा. प्रेमनगर टेकडी, उल्हासनगर–५) याच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असलेल्या या आरोपीला स्थानबद्ध आदेशान्वये कारागृहात पाठविले आहे. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आणि मा. न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, ५वे न्यायालय, उल्हासनगर यांच्याकडून आवश्यक ती कायदेशीर परवानगी घेण्यात आली. त्यानंतर पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संदीप शिवले यांच्या पथकाने संबंधित आरोपीला येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध केले. शहरात वारंवार कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई केल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babar Azam च्या कारकीर्दिला पूर्णविराम? पाकिस्तानने संघातून केली हकालपट्टी; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर झाला 'गेम'

Stock Market Today: शेअर बाजारात 22 लाख कोटींचे नुकसान! सलग तिसऱ्या दिवशी बाजार लाल रंगात बंद; कोणत्या सेक्टरला फटका?

Crime: 'तुमच्या आधार कार्डचा वापर करून मनी लाँड्रिंग झालेय’, सरकारी अधिकाऱ्याची फसवणूक; ४९ लाख रुपयांचा गंडा

Latest Marathi News Live Update : आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मदत जाहीर करा- अन्यथा परीणाम भोगावे लागतील- राजू शेट्टी

T20 WC, IND vs ENG: वानखेडेची खेळपट्टी पाहून गौतम गंभीर क्युरेटरवर संतापला? सेमीफायनलपूर्वी ड्रामा, त्या व्हायरल फोटोमुळे चर्चा

SCROLL FOR NEXT