मुंबई

उल्हासनगरमध्ये दोन निरीक्षकांची नियुक्ती

CD

उल्हासनगर, ता. १ (बातमीदार) : उल्हासनगर महापालिका निवडणूक प्रक्रियेवर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे दोन्ही अधिकारी महापालिकेत दाखल झाले आहेत.
नीलेश गटणे यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून, ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर रवींद्र ठाकरे हे दुसरे निवडणूक निरीक्षक असून ते महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामउद्योग महामंडळाचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. हे दोन्ही अधिकारी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर दररोज निरीक्षण ठेवणार आहे. त्याबाबतचा सविस्तर अहवाल थेट निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत.
महापालिकेत दाखल होताच मुख्य निवडणूक निरीक्षक नीलेश गटणे आणि निवडणूक निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे तसेच निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासोबत शहरातील संपूर्ण निवडणूक यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

निर्णय अधिकारी
यापूर्वीच निवडणूक आयोगाने उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी बाळासाहेब तिडके, गणेश सांगळे, विशाल वसंतराव जाधव, विजयकुमार वाकोडे, मुकेश पाटील आणि डॉ. संजय शिंदे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या अधिकाऱ्यांनी उमेदवारांना नामनिर्देशपत्रांचे वितरण, उमेदवारी अर्ज स्वीकारणे; तसेच अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT