मुंबई

पादचारी पुलावर नशेखोरांचा अड्डा, भटकी कुत्र्यांची दहशत

CD

पादचारी पुलावर नशेखोरांचा अड्डा, भटक्या कुत्र्यांची दहशत
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
कांदिवली, ता. १ (बातमीदार) ः मालाड पूर्वेकडील द्रुतगती मार्गालगत शांताराम तलावाजवळ असलेल्या कुरार पादचारी पुलावर नशेखोरांनी बस्तान मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठी लोकवस्ती असून शाळा, बाजारपेठा व दैनंदिन व्यवहारासाठी नागरिक, विद्यार्थी आणि पालक यांची या पुलावरून सातत्याने ये-जा असते.
गेल्या काही महिन्यांपासून काही नशेखोर पुलावरच बसणे, झोपणे तसेच मद्यसेवन करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच पुलावर फिरणारी भटकी कुत्रे यामुळे विशेषतः महिला, विद्यार्थी आणि पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. अनेकांना जीव मुठीत घेऊनच पुलावरून प्रवास करावा लागत आहे.
द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक असल्याने रस्ता ओलांडणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने दहिसर ते अंधेरीदरम्यान वर्दळीच्या ठिकाणी पादचारी पूल उभारले असून, त्यांच्या देखभालीची जबाबदारी एमएमआरडीएकडून पालिकेकडे सोपविण्यात आली आहे. मात्र कुरार पादचारी पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
पी उत्तर विभागातील पालिका अभियंता रोशन खरात यांनी सांगितले, की स्थानिक पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कळवून योग्य कारवाई करण्यात येईल.
पालिका नागरिकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सुविधा उभारते, मात्र देखभाल व स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते. किमान नवीन वर्षात तरी प्रवाशांना दिलासा मिळावा, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी केली आहे.

पोलिस, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
विशेष म्हणजे कुरार पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर असतानाही नशेखोरांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पोलिस व महापालिका पी/उत्तर विभागाने संयुक्त कारवाई करून पुलावरील नशेखोर व भटकी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी महिला पालकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT