मुंबई

धारावीत शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी

CD

धारावीत शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी
तिकीट नाकारल्‍याने कार्यकर्ते अस्‍वस्‍थ
धारावी, ता. १ (बातमीदार) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत धारावीतील वॉर्ड क्रमांक १८९, १८४ व १८६ मध्ये शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी झाली आहे. तिकीट नाकारल्‍याने कार्यकर्ते अस्‍वस्‍थ आहेत.
सर्वसामान्य शिवसैनिकांना तिकीट मिळत नसल्याची तक्रार करीत वॉर्ड क्रमांक १८४ मधील गेल्‍या ४५ वर्षांपासून कार्यरत ज्‍येष्ठ शिवसैनिक व शाखा संघटक विलास बागडे यांनी आपल्या पत्नीचा उमेदवारी अर्ज भरला आहे.
वॉर्ड क्रमांक १८३ मधील शिवसैनिक गणेश खाडे यांनीही बंडखोरी करीत थेट राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातून आपल्या पत्नीचा उमेदवारी अर्ज भरला आहे. माधुरी गायकवाड यांनी वॉर्ड क्रमांक १८६ मधून उमेदवारी अर्ज भरला. त्‍यामुळे धारावीत खळबळ निर्माण झाली आहे.
ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका मरिअम्मल मुत्तू तेवर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्‍याने ठाकरे गटाला मोठा धक्‍का बसला होता. त्‍यानंतर गणेश खाडे व विलास बागडे, माधुरी गायकवाड यांनी बंडखोरी केल्याने एकसंध राहिलेल्या धारावीतील शिवसेनेला गळती लागली आहे. विलास बागडे यांनी आशा विलास बागडे यांचा वॉर्ड क्रमांक १८४ मधून अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. तर वॉर्ड क्रमांक १८३ मधून गणेश खाडे यांच्या पत्नी राजश्री गणेश खाडे यांचा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून अर्ज भरला आहे. माधुरी गायकवाड यांना पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती; मात्र त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. यामुळे त्यांनीही बंडखोरी करीत वॉर्ड क्रमांक १८६ मधून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: माळेगाव कारखान्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संचालकपदी बिनविरोध; संचालक मंडळाच्या विशेष सभेत निर्णय!

Viral Video : तुम्हीही नाश्त्यात पोहे आवडीने खाता ? व्हायरल व्हिडिओ पाहून उघडतील डोळे

PAK vs NAM सामन्यावर पावसाचे ढग; ऑस्ट्रेलियासारखीच पाकिस्तानची अवस्था होणार? नेमकं कसं आहे समीकरण

Latest Marathi News Live Update : सातारा नगरपरिषदेच्या ‘अघोरी नृत्या’ला अंनिसचा विरोध

Railway Loco Pilots: प्रशासनाकडून दबाव, तणावपूर्ण कामकाज अन्...; मुंबई लोकलच्या लोको पायलटांचा सामूहिक VRS अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT