मुंबई

विद्यार्थ्यांनी गुंफले आकर्षक फुलांचे आविष्कार

CD

विद्यार्थ्यांनी गुंफले आकर्षक फुलांचे आविष्कार
कलेच्या दुनियेत रमले बालकलाकार
माणगाव, ता. १ (वार्ताहर) : माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर नारायण शिपूरकर इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेत नुकतीच पार पडलेली पुष्पगुच्छ स्पर्धा चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा रंगतदार आविष्कार ठरली. इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी कागद, कल्पक नक्षीकाम आणि आकर्षक मांडणीच्या साहाय्याने विविध फुलांचे सुंदर पुष्पगुच्छ साकारले. शाळेच्या वर्गखोल्या जणू फुलांच्या दुनियेत परिवर्तित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
फुले घडवताना विद्यार्थी इतके तल्लीन झाले होते, की त्यांना वेळेचे भानही राहिले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, डोळ्यांतील चमक आणि हातातील कौशल्य पाहून शिक्षक व पालकही भारावून गेले. देशविदेशातील फुलांची रूपे, रंगसंगती आणि सुबक सजावट यामधून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती प्रकर्षाने दिसून आली. या स्पर्धेत सुमारे ९० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

चौकट
सर्जनशीलतेतून आत्मविश्वासाला बळ
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, आत्मविश्वास वाढावा आणि कल्पनाशक्तीला दिशा मिळावी, या उद्देशाने शाळेत असे उपक्रम राबवले जातात. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना स्वतःची कला मांडण्याची संधी मिळाली. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात गौरव करण्यात येणार असून लवकरच त्यांच्या कलावस्तूंचे भव्य प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT