मुंबई

समाज माध्यमांच्या आडून व्यावसायिकांकडून खंडणी

CD

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : समाज माध्यमांवर व्यावसायिकांना बदनाम करण्याची धमकी देत त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. परमेश्वर प्रकाश सिंग (वय ३१) उर्फ मोनू असे या खंडणीखोराचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात आढळून आले आहे.

एपीएमसी मार्केटमधील व्यापारी, टपरी चालक, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या व्यवसायावर प्रशासनाची कारवाई व्हावी, अशा प्रकारची पोस्ट परमेश्वर सिंग हा समाज माध्यमांवर टाकत होता. त्यानंतर तो संबंधित व्यावसायिकाविरोधात पुन्हा तक्रार न करण्यासाठी दरमहा खंडणी स्वरुपात पैसे उकळत होता. अशाच पद्धतीने त्याने एपीएमसीसह शहरातील विविध परिसरातील व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्यास सुरुवात केली होती. काही प्रकरणांत त्याच्या भावाचाही सहभाग असल्याचे आढळून आले आहे.

काही दिवसांपूर्वी त्याने एका पुरी-भाजी विक्रेत्याकडून दोन लाख ४४ हजार रुपये खंडणी उकळली होती. त्यानंतर त्याने एका टपरीचालकालाही धमकावून त्याच्याकडून ३० हजार रुपये उकळले होते. या विक्रेत्याने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर परमेश्वर सिंग याने तक्रारदार व इतर साक्षीदारांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्वत:ला पत्रकार असल्याचे भासवून पोलिसांवरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र एपीएमसी पोलिसांनी अखेर मंगळवारी (ता. २७) रात्री त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT