मुंबई

पनवेल पालिकेकडून आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी

CD

पनवेल, ता. १ (बातमीदार) : आदर्श आचारसंहितेची काटेकोर व पारदर्शक अंमलबजावणी व्हावी, यासाठी पनवेल महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निराकरण होणे, तसेच निवडणूक प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी आचारसंहिता कक्ष व तक्रार निवारण कक्ष महापालिका मुख्यालयात सुरू करण्यात आला आहे. तसेच या कक्षाची माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांची आचारसंहिता पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहाय्यक म्हणून उपायुक्त रवीकिरण घोडके नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी आदर्श आचारसंहितेबाबत कोणतीही तक्रार, सूचना किंवा माहिती द्यावयाची असल्यास ०२२ २७४५ ८०४० / ८०४१ / ८०४२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा panvelcorporationmcc@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेत शिस्त, नियमपालन व पारदर्शकता राखण्यासाठी महापालिका सतत दक्ष असून नागरिकांचा सहभाग व सहकार्य महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीचे भाव घसरले! चांदी तब्बल ₹8,000 ने स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

Shoaib Akhtar : पाकिस्तानमधील क्रिकेट नामशेष होण्याच्या मार्गावर! भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

Australia vs Sri Lanka: झिम्बाब्वेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी, आज श्रीलंकेशी निर्णायक लढत

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

Mumbai : अल्पवयीनाने कारनं उडवलं, १० दिवसांनी पतीचा मृत्यू; पत्नीची प्रकृतीही चिंताजनक

SCROLL FOR NEXT