मुंबई

२५० तळीराम पोलिसांच्या ताब्यात

CD

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : थर्टी-फस्टच्या मध्यरात्री नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र नवी मुंबई पोलिसांकडून थर्टी-फस्टच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या ड्रन्क ॲण्ड ड्राईव्हच्या मोहिमेत मद्यप्राशन करून वाहन चालविणारे २५० तळीराम पोलिसांच्या हाती लागले आहेत. या सर्वांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई कली आहे. त्याशिवाय पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन हजार ५५० वाहनचालकांवरही कारवाई केली आहे.

याही वर्षी नवी मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात आणि धुमधडाक्यात नववर्ष साजरा केला. थर्टी-फर्स्टच्या निमित्ताने नवी मुंबई पोलिसांनी आपल्या हद्दीत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच महामार्गावरील टोल नाके, शहरातील महत्वाचे चौक, सिग्नल, जंक्शन अशा विविध ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे शहरात थर्टी-फस्टच्या मध्यरात्री कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. थर्टी-फस्ट आणि नववर्ष शांततेत साजरा झाल्याने पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला आहे.

यापुढील काळातदेखील वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी दिली.

नियमभंग कारवाई
सार्वजनिक मार्गावर अडथळा २१
ज्वालाग्राही पदार्थाचा निष्काळजी वापर २०
बेकायदा मद्यपान ३
सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन ३८

मद्यप्राशन करून वाहन चालवणे ५५
कोटपा कायद्यान्वये कारवाई ४७
मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन २५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT