मुंबई

दादर, वरळीत बंडखोरी आणि नाराजी नाट्य

CD

दादर, वरळीत बंडखोरी आणि नाराजीनाट्य
पक्षाच्या वरिष्‍ठांकडून मनधरणीचे प्रयत्‍न
प्रभादेवी, ता. १ (बातमीदार) : दादर-वरळी विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून, उमेदवारी देण्यावरून जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
तिकीट वाटपात स्थानिक नेत्यांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे दादर, वरळी परिसरात दोन्ही शिवसेना आणि मनसेमध्ये बंडखोरीला उधाण आल्याचे चित्र आहे. दादर आणि वरळी परिसरात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून उमेदवार लादल्याचा आरोप केला जात आहे. त्‍यामुळे जमिनीवर राहून पक्षासाठी तन-मन अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत असून, काहींनी थेट वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत.
दादर प्रभाग क्रमांक १९२ मधून मनसेने यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर या प्रभागातील माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या जागेवर इच्छुक असलेल्या मनसेच्या स्नेहल जाधव यांनी सचिव पदाचा राजीनामा दिला. पाटणकर यांना शिंदे गटातून उमेदवारी दिल्यानंतर दादरमधील शिंदे गटाचे आणि सदा सरवणकर यांचे खंदे समर्थक विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर हेदेखील नाराज झाले. त्यामुळे दादरमध्ये झालेली बंडखोरी आणि नाराजीमुळे ठाकरे विरुद्ध शिंदे सेना अशी कडवी लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक १९३ मधून शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी इच्छुक होते. मात्र माजी उपमहापौर असलेल्या हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी दिल्याने कोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
प्रभाग क्रमांक १९०मध्ये आशीष चेंबूरकर यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर यांना उमेदवारी दिल्याने महिला युवा विभाग अध्यक्ष असलेल्या आकर्षिका पाटील नाराज झाल्‍या. वरळीमध्ये स्थानिक प्रश्न, पुनर्विकास, नागरी सुविधा आणि रोजगार यावरून मतदारांमध्ये असंतोष असून, त्याचा फटका पक्ष संघटनांना बसत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, नाराजी शांत करण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते समजूत काढत आहेत. मात्र निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेले हे नाराजीनाट्य आणि अंतर्गत मतभेद पक्षांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

SCROLL FOR NEXT