मुंबई

मिरा भाईंदरमध्ये महापौर भाजपचा असेल

CD

मिरा-भाईंदरमध्ये महापौर भाजपचाच
कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यावर रवींद्र चव्हाण यांचा खुलासा

भाईंदर, ता. १ (बातमीदार) : मिरा-भाईंदरचा महापौर भारतीय जनता पक्षाचा असेल व त्याची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील प्रदेश पातळीवरील समिती घेईल, असे स्पष्ट मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मिरा रोड येथे व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी मिरा-भाईंदरचा आगामी महापौर उत्तर भारतीय समाजाचा असेल, असे वक्तव्य केले होते. त्यावर चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

महापालिका निवडणुकीनिमित्त भाजपकडून मिरा रोड येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या वेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते. प्रत्येकजण आपल्या मनातील भूमिका सांगत असतो; मात्र मिरा-भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर असेल, ही पक्षाची भूमिका आहे. राज्यात सर्व महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर असेल, तर मिरा- भाईंदरमध्ये भाजपचा महापौर असेल. निवडणूक झाली की महापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांची नावे प्रदेशाकडे येतील, त्यानंतर प्रदेश पातळीवरील पक्षाची समिती त्यावर निर्णय घेईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

न्याय देण्याची भूमिका
ठिकठिकाणी झालेल्या बंडखोरीवर बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, की राज्यात २९ महापालिकांमध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवडणूक लढण्यास इच्छुक होते. कार्यकर्त्यांना न्याय देण्याची पक्षाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. जागा मर्यादित असल्याने काही चांगल्या कार्यकर्त्यांनादेखील संधी देणे कठीण होते; मात्र पक्षाचे कार्यकर्ते समजूतदार आहेत. स्थानिक पातळीवरील जिल्हा समिती व राज्यस्तरीय समिती ज्याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी व त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या संधी देता येणे शक्य आहे, असे त्यांना सांगण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Latest Marathi News Live Update : कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, गॅस टंचाईचा जालन्यातील स्टील उद्योगालाही फटका...

सूर्यकुमार यादवचं 'Olympics Gold' लक्ष्य; गौतम गंभीरचे धक्कादायक विधान, भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी गोष्ट

सिग्नल तोडला अन् पूजा सावंतला पोलिसांनी पकडलं; आयडीवरचं आडनाव वाचताच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT