मुंबई

पदपथावर सर्रास विजेच्या केबल जाळण्याचा प्रकार

CD

पदपथावर सर्रास विजेच्या केबल जाळण्याचा प्रकार
मुंबई, ता. १ : मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात ब्लॉक क्रमांक २ समोरील पदपथावर सर्रास विजेच्या केबल जाळण्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अज्ञात व्यक्तींनी केबलमधील तांबे काढण्यासाठी जमा केलेल्या केबल भरदिवसा पदपथावरच जाळल्या. या प्रकारामुळे परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे मुंबईतील वायू प्रदूषण काही प्रमाणात कमी झाले असतानाच दुपारी साडेतीनच्या सुमारास केबल जाळल्याने पुन्हा प्रदूषणात वाढ झाली आहे. केबल जाळण्यामुळे केवळ वायू प्रदूषणच नव्हे, तर पर्यावरणाचाही गंभीर ऱ्हास होत आहे. पदपथावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना धुराचा त्रास सहन करावा लागत असून, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकाराकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच अशा बेकायदा व पर्यावरणाला हानी पोहोचवणारे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

हा आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेचा नवरा; या ठिकाणी दणक्यात पार पडणार लग्न; हास्यजत्रेच्या कलाकारांनी केली पोलखोल

Latest Marathi News Live Update : उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे गोंधळाची परिस्थिती

युद्धामुळे तांदूळ निर्यातीला फटका; विदर्भाचा बासमती अन् आंबेमोहोर अडकला बंदरात, भावही घसरले...

SCROLL FOR NEXT