मुंबई

वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट

CD

वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट
आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते सेवाखंड क्षमापित पत्राचे वितरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड कालावधीत क्षमापित पत्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. गेली २० वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांचे आभार मानले. या वेळी डॉक्टरांनी लोकांना अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी पार पाडावी. चांगले काम करावे. तुमच्या हक्काच्या गोष्टी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री आबिटकर म्हणाले.

१५० डॉक्टरांना नुकतेच सेवा खंड कालावधी क्षमापित केले होते. एकूण ३४५ डॉक्टरांना पत्र देण्यात आले असून, उर्वरित सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना येत्या महिनाभरात क्षमापण पत्राचे वितरण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी या वेळी सांगितले. या ऐतिहासिक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ मिळू शकणार आहेत. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्य विभागात २००९ पूर्वी अस्थायी स्वरूपात अनेक वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. २००९मध्ये या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश झाला आहे; मात्र सेवाखंड कालावधी क्षमापित नसल्याने त्यांना इतर लाभापासून वंचित राहावे लागत होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेकडून याबाबत वारंवार मागणी होत होती. त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड क्षमापित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची सलग सेवा ग्राह्य धरण्यात येणार असून, त्यामुळे इतर आर्थिक व प्रशासकीय लाभ त्यांना मिळतील.

नव्या निर्णयामुळे आरोग्यसेवेत गुणात्मक वाढ होईल. नक्षलग्रस्त आदिवासी व डोंगरी भागात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासह विशेष इन्सेंटिव्ह देण्यासाठीदेखील वित्त विभागास प्रस्ताव पाठवला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू झाली असून, उपचारासाठी मान्य असलेल्या आजारांची संख्या वाढवून २,३९९ करण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधनातही भरघोस वाढ करण्यात आली आहे.
- प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी

Pune News : राहुल गांधी यांच्या आवाजाचा नमुना घेऊन त्याचे विश्लेषण व तुलना करावी; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज

कॅन्सरला हरवलं पण मृत्यूशी झुंज अपयशी; 'रेडी' फेम अभिनेत्री प्रवीणा देशपांडे काळाच्या पडद्याआड

Pune Crime : उद्योजकांकडून मोहजालात अडकवून खंडणी उकळणाऱ्या दाम्पत्याला अटक

Baramati News : माझी वसुंधरा अभियानांतर्गत बारामती नगरपरिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक....

SCROLL FOR NEXT