मुंबई

मुस्लिम आणि वंचितासाठी काम करणाऱ्या उमेदवारांना पांठिबा

CD

मुस्लिम आणि वंचितांसाठी काम करणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनची भूमिका


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईसह राज्यात होत असलेल्या महापालिका निवडणुकीत मुस्लिम, बहुजन व वंचित समाजाच्या शिक्षण, आरक्षण व संरक्षण या मूलभूत मुद्द्यांना आपल्या जाहीरनाम्यात  स्थान देणाऱ्या उमेदवारांना मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने पाठिंबा जाहीर केला आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


मुस्लिम, बहुजन व वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या हितासाठी तसेच त्यांच्या शिक्षण, आरक्षण व संरक्षणासाठी काम करणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका संघटनेचे अध्यक्ष सलीम सारंग यांनी जाहीर केली आहे. या मुद्द्यांना धोरणात  तसेच निवडणूक जाहीरनाम्यात  स्थान देणाऱ्या उमेदवारांना मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनकडून पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. सारंग पुढे म्हणाले, ‘समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी आणि सक्षम साधन आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, युवकांचा कौशल्य विकास आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी ठोस व परिणामकारक धोरण मांडणाऱ्या उमेदवारांना संघटनेचा पाठिंबा मिळेल. तसेच समाजामध्ये वाढत चाललेली नशाखोरी ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली असून, नशामुक्ती अभियान, युवकांना योग्य दिशा देणे, पुनर्वसन आणि जनजागृतीसाठी कटिबद्ध असलेल्या उमेदवारांना संघटना पाठिंबा असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

SCROLL FOR NEXT