मुंबई

- शिवसेना शिंदे पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध

CD

शिंदे गटाचे सात उमेदवार बिनविरोध
ठाण्यात शिवसेनेचे खाते उघडले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे महापलिका निवडणुकीत महायुती म्हणून शिवसेना शिंदे आणि भाजप निवडणुकीला सामोरे जात आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वागळे इस्टेट तसेच वर्तकनगर भागातील शिवसेनेचे (शिंदे गट) सात उमदेवार बिनविरोध निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील हे उमदेवार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील वागळे इस्टेट पट्ट्यातील प्रभाग क्रमांक १८ मधील जयश्री फाटक, सुखदा मोरे आणि राम रेपाळे हे तिघे विजयी झाले आहेत. तर या प्रभागातील उमेदवार दीपक वेतकर यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नीलेश लोहाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते; मात्र त्यात यश आले नसल्याने वेतकर हे बिनविरोध होऊ शकले नाहीत.
दरम्यान, सावरकरनगरमधील प्रभाग क्रमांक १४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार अरुणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर मनसेच्या उमेदवार रेश्मा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. यामुळे शिवसेना (शिंदे गट) उमेदवार शीतल ढमाले या बिनविरोध निवडून आल्या. तसेच किसननगर येथील प्रभाग क्रमांक १७ मधून एकता भोईर, तर वर्तकनगर येथील प्रभाग क्रमांक ५ मधील शिवसेना (शिंदे गट) जयश्री डेव्हिड आणि सुलेखा चव्हाण या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT