मुंबई

शिवसेनेच्या ‘ममु’ला मराठी-हिंदूने उत्तर!

CD

शिवसेनेच्या ‘मामु’ला मराठी-हिंदूने उत्तर!
मुंबईत महापौर मराठीच : ॲड. आशीष  शेलार

 मुंबई, ता. २ : लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता मुंबई महापालिका निवडणुकीतही  मराठी माणसाबरोबरच मुस्लिमांना कुरवाळत ‘मामु’ (मराठी-मुस्लिम) फाॅर्म्युल्यावर  स्वार होण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा  डाव आहे. केवळ मतांसाठी मराठी माणसाचा वापर करणाऱ्या शिवसेनेनेच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच ते आता मुस्लिमांना जवळ करत आहेत. त्याला आम्ही मराठी-हिंदुत्वाने सडेतोड उत्तर देणार असून त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेते ॲड. आशीष शेलार यांनी शुक्रवारी ‘सकाळ संवाद’ या कार्यक्रमात दिला.

महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आशीष शेलार यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर खुलेपणाने मते मांडली. आम्ही कट्टर मराठी आणि प्रखर हिंदुत्ववादी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठी माणसाच्या मुद्द्यावरून शेलार म्हणाले, ‘मराठी माणसाला उद्धव ठाकरे यांनीच  मुंबईबाहेर घालवले आहे. निवडणुका आल्या की उद्धव ठाकरे यांना मराठी माणूस आठवतो. मुंबई महाराष्ट्रापासून  तोडण्याचा डाव असल्याचे ते बोलतात; पण आतापर्यंत मराठी माणसासाठी त्यांनी कोणती धोरणे राबवली आहेत, याची त्यांनी उत्तरे द्यावीत.’

मराठीच महापौर!
‘मुंबईचा महापौर मराठी माणूस होणार; मात्र ते करताना आम्ही हिंदुत्वाला जराही अंतर देणार नाही. हिंदूंमध्ये विभाजन होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जाणार आहे. दरवेळी निवडणुका आल्यावर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार असल्याचे फेक नॅरेटिव्ह सातत्याने पसरवले जात आहे. मी मुंबईकरांना आश्वासित करतो, की मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होणार नाही, कोणीही करू शकत नाही,’ असे आशीष शेलार यांनी ठामपणे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

Latest Marathi Live Update: विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू

Latur Police Bharti: लातूरमध्ये पोलिस शिपाई भरतीची आज लेखी परीक्षा; ३२८ उमेदवार सज्ज

SCROLL FOR NEXT