मुंबई

नवी मुंबईत ४९९ अंतिम उमेदवार रिंगणात

CD

नवी मुंबई महापालिकेसाठी ४९९ उमेदवार रिंगणात
१११ जागांसाठी भाजपकडे ११० उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. दिवसभरात २६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे १११ जागांसाठी ४९९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यात शिवसेनेचे १११ तर भाजपचे एक बाद झाल्यामुळे ११० उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज विक्री झाली होती. त्यापैकी ९८९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात अपक्ष उमेदवारांसह शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक होती. दरम्यान, अर्ज अवैध ठरल्याने भाजपच्या १३ बंडखोरांचे आव्हान संपुष्टात आले. तर उर्वरित अर्ज वैध ठरल्याने आज दिवसभर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बंडखोर उमेदवारांच्या मनधरणीचे काम केले. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनीही ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी धावपळ केली. ऐरोली प्रभाग क्रमांक ३ मधून शिंदे गटाचे नाराज झालेले कार्यकर्ते साहील चौगुले यांनी भरलेला अर्ज मागे घेतला. तर रबाळे येथे प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार महेंद्र सावंत यांच्याविरोधात नाराज पदाधिकारी वत्सला कांबळे, रेखा कांबळे यांनी भरलेला अपक्ष अर्ज मागे घेतला. बोनकोडे गावात शिंदे गटाच्या उमेदवार शबाना खान यांच्या विरोधात बंडखोर उमेदवार सचिन कांबळे यांनी भरलेला अर्ज मागे घेतला. तसेच घणसोलीमध्ये ॲड. बिपिन तायडे यांनी शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार दशरथ जगताप यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. तोदेखील मागे घेण्यात शिंदे गटाच्या नेत्यांना यश आले.
—————————————

उमेदवारी नामनिर्देशन पत्र माघारीचा तपशील

बेलापूर - ४६ अर्ज मागे घेतले / ७४ अंतिम उमेदवार
नेरूळ - ५५ अर्ज मागे घेतले / ७९ अंतिम उमेदवार
वाशी - २५ अर्ज मागे घेतले / ४६ अंतिम उमेदवार
तुर्भे - ३३ अर्ज मागे घेतले / ८४ अंतिम उमेदवार
कोपरखैरणे - २९ अर्ज मागे घेतले / ६२ अंतिम उमेदवार
घणसोली - ३० अर्ज मागे घेतले / ४४ अंतिम उमेदवार
ऐरोली - २९ अर्ज मागे घेतले / ५२ अंतिम उमेदवार
दिघा - २२ अर्ज मागे घेतले / ५८ अंतिम उमेदवार
------------------------------------
एकूण* - २६९ अर्ज मागे घेतले / ४९९ अंतिम उमेदवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या गुरुजनांना मानाचा मुजरा, गुरु-शिष्याची अनोखी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

Mumbai News: ताडदेवस्थित वेलिंग्डन हाइट्सचे प्रकरण; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार, कोर्टात काय घडलं?

SCROLL FOR NEXT