महाविकास आघाडी केवळ नावापुरती
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : महाराष्ट्रात २०१९ मध्ये स्थापन झालेली महाविकास आघाडी आता केवळ नावापुरती उरली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिचे विसर्जन झाले आहे, असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला. महाविकास आघाडीकडे कोणताही ठोस विचार नसल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी ठाण्यातील वर्तकनगर येथील भाजप कार्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या मीडिया सेंटरचे उद्घाटन केशव उपाध्ये यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, शहराध्यक्ष संदीप लेले, सागर भदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. २०१९ मध्ये शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले होते. त्यांच्याकडे कोणताही वैचारिक अधिष्ठान नव्हते. त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. २९ महापालिका निवडणुकांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार संजय केळकर यांनी सांगितले, की विधानसभा निवडणुकांच्या वेळीच आम्ही स्पष्ट केले होते, की महाराष्ट्राचा विकास आता थांबणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासकामे वेगाने सुरू आहेत. जनतेने भाजपला भरभरून प्रेम दिले आहे. सध्या केंद्र आणि राज्यात ‘डबल इंजिन’ सरकार आहे; मात्र विकासाला अधिक गती देण्यासाठी महापालिकांमध्येही भाजपची सत्ता येऊन ‘ट्रिपल इंजिन’ सरकार आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.