मुंबई

गोवंडी शताब्दी रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद; रुग्णांचे हाल

CD

गोवंडी शताब्दी रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद; रुग्णांचे हाल
जीवन तांबे : सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. १ (बातमीदार) : गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयातील एमआरआय मशीन गेल्या १५ दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून, हे मशीन तत्काळ सुरू करण्याची मागणी नेस्ट सामाजिक संस्थेने केली आहे.
पूर्व उपनगरांतील गोवंडी येथील हे पालिकेचे एकमेव शताब्दी रुग्णालय असून, येथे गोवंडी, देवनार, शिवाजीनगर, कुर्ला, झेंडानगर, माहुल, चेंबूर, घाटला, वाशीनाका, ट्रॉम्बे व मानखुर्द या विभागांतील रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र एमआरआय मशीन बंद असल्याने या भागातील रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे एमआरआय मशीन जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत बंद राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी रुग्णांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय, सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, नायर, केईएम रुग्णालय अथवा खासगी रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी जावे लागत आहे. यामुळे आर्थिक बोजाही वाढत आहे.
शताब्दी रुग्णालयात यापूर्वीही विविध सुविधांच्या अभावामुळे वाद निर्माण झाले आहेत. एमआरआय मशीन बंद असल्याने काही रुग्णांना थेट दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत चिलकुंद यांची बदली झाल्याने त्यांची जागा अद्याप रिक्त आहे. यासंदर्भात संबंधित डॉक्टर उपस्थित नसल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. एमआरआय मशीन बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. ते त्वरित सुरू करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- राजू नगराळे, सामाजिक कार्यकर्ते

एमआरआय मशीन बंद असल्याने खासगी रुग्णालयात तपासणीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. पालिका प्रशासन सामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे.
- आशा कदम, रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

आता मजा येणार ! मानिनीने केली रम्या आणि वसू आत्याच्या कारस्थानची पोलखोल ; प्रेक्षक झाले खुश

Pune crime cctv: पुणं हादरलं! मित्राची थट्टा केली म्हणून आला राग, सपासप वार करत केला खून! सीसीटीव्ही व्हायरल

SCROLL FOR NEXT