मुंबई

डहाणूतील कंक्राडी नदी प्रदूषण खटल्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष;

CD

कंक्राडी नदी प्रदुषणाला अभय
८ वर्षांपासून प्रकरण न्यायालयात, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
कासा, ता.३ (बातमीदार)ः डहाणूतील कंक्राडी नदीच्या प्रदूषणप्रकरणी २०१७ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डहाणू नगर परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांवर फौजदारी दावा दाखल केला होता. मात्र, मंडळाने प्रकरणाचा योग्य पाठपुरावा केला नसल्याने हा खटला आठ वर्षांपासून रेंगाळल्याचा आरोप ‘सोसायटी फॉर फास्ट जस्टिस’ या संस्थेने केला आहे.
कंक्राडी नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने डहाणूतील खाडी, भूजल, पर्यावरणावर वाईट परिणाम होत आहे. २०२३ मध्ये पोलिसांचा अहवाल दाखल झाला. नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रथमच जबाबदार अधिकारी न्यायालयात हजर झाले. विशेष म्हणजे, १० डिसेंबर २०२५ रोजीच्या कामकाजात मूळ अर्जावरच आदेश झाल्याचे दिसत असल्याने हा दावा निकाली निघणार का, अशी भीती व्यक्त होत आहे. विलंबामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क डावलला जात आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने वरिष्ठ कायदेशीर अधिकाऱ्याची नेमणूक करावी, प्रत्येक तारखेला हजर राहून तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
-----------------------------------
नदीतील मासे मृत्यूमुखी
डहाणू न्यायालयात २०१७ मध्ये पाणी परीक्षणाच्या आधारावर हा खटला भरला होता. याच दरम्यान, नदीतील मासे मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच न्यायालयाच्या कामकाजाचा तपशील (रोजनामा) संस्थेने तपासला असता, अनेक तारखांना मंडळाचे अधिकारी किंवा वकील गैरहजर असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT