मुंबई

कल्याण–डोंबिवलीत महायुतीचा विरोधाभास

CD

कल्याण-डोंबिवलीत महायुतीचा विरोधाभास
प्रभाग २९ मध्ये भाजप विरुद्ध शिंदेसेना मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ ः कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अनेक प्रभागांमध्ये बिनविरोध निवडून येत असताना, दुसरीकडे एका पॅनलमध्ये मात्र भाजप आणि शिंदे गट आमनेसामने येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे युतीधर्म पाळला गेला का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
डोंबिवलीत बिनविरोध निवडींची प्रक्रिया सुरू असतानाच आता प्रभाग २९ मध्ये मात्र भाजप आणि शिंदे गटात थेट सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रभागात दोन्ही पक्षांनी स्वतंत्र पॅनल उभे केल्याने युतीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रभाग २९ मधून शिंदे गटाच्या शिंदे गटाकडून रुपाली म्हात्रे, रंजना पाटील, कविता म्हात्रे, नितीन पाटील आणि रवींद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून कविता म्हात्रे, आर्या नाटेकर, अलका म्हात्रे आणि मंदार टावरे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे या प्रभागात भाजप विरुद्ध शिंदे गट अशी थेट व मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रमुख नेत्यांची होणार बैठक
महत्त्वाचे म्हणजे, शहरातील इतर प्रभागांमध्ये युतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असताना, प्रभाग २९ मध्ये मात्र वेगळे चित्र दिसत असल्याने महायुतीतील स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. युती असूनही स्वतंत्र उमेदवारी का दिली गेली, याबाबत तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, या पॅनलबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी महायुतीतील काही प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत तोडगा निघतो की संघर्ष अधिक तीव्र होतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

Latest Marathi Live Update: आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा आज

Latur Police Bharti: लातूरमध्ये पोलिस शिपाई भरतीची आज लेखी परीक्षा; ३२८ उमेदवार सज्ज

Unseasonal Rain: राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली; १७ ते २० मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT